मोदींनी बांधलेला मोठा पुतळा बंद आहे; तर नेहरूंनी बांधलेली रुग्णालये २४ तास खुली
मुंबई, १९ मार्च: जगभरात कोरोना रोगाच्या वृत्ताने थैमान घातले आहे. जिकडे तिकडे कोरोनाचीच चर्चा आणि त्यांसंदर्भात जनजागृती व उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चीनमधून सुरुवात झालेला हा रोग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये, अनेक संस्थांना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, पर्यटनांच्या ठिकाणांनाही टाळे लागले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना लक्ष्य केलंय.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन कोरोनाची दाहकता सांगताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात अनेकदा माजी पंतप्रधान आणि दिवंगत नेते पंडित जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख केला जातो. तसेच, देशातील अनेक घटनांना नेहरूच जबाबदार असल्याचे म्हटले जाते. त्याच, पार्श्वभूमीवर नेहरूंना उद्देशून मोदींवर काँग्रेस समर्थकांकडून टीका करण्यात येते. सोशल मीडियावर सातत्याने हा ट्रेंड पाहायला मिळतो. आता, जितेंद्र आव्हाड यांनी एक उपहासात्मक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, ‘मोदींनी बांधलेला मोठा पुतळा बंद आहे; तर नेहरूंनी बांधलेली रुग्णालये २४ तास खुली आहेत’.
The Big Statue built by #Modi is closed for tourists.
The Hospitals that #Nehru built are open 24 hours.#CoronavirusOutbreak #COVID2019 #coronavirusindia— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 18, 2020
तत्पूर्वी म्हणजे १४ नोव्हेंबर २०१७ रोजी देखील जितेंद्र आव्हाड यांनी नेहरूंच्या कामांची स्तुती केली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आजच्या १२८ व्या जयंती दिवशी त्यांना आदरांजली वाहण्याऐवजी त्यांची कुचेष्टा करण्याचेच उद्योग सुरु होते. मोदी समर्थकांनी तर त्या विषयावरून समाज माध्यमांवर थैमान मांडलं होतं. त्यामुळे तरुण पिढीही त्या अपप्रचाराला बळी पडल्याचं पाहायला मिळत होतं, परंतु नेहरू नसते तर आज भारत आणखी १०० वर्षे मागे गेलेला दिसला असता आणि इथिओपिया किंवा सोमालियाच्या पातळीवर घसरला असता हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवे,असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं.
आव्हाड म्हणाले होते, आज काही निवडक उद्योगपती सरकारच्या पाठिंब्याने देशात हैदोस घालत असतांना, नेहरूंची ही थोरवी आजच्या तरुण पिढीने विसरू नये. नेहरू यांच्या समाजवादामुळे १९९० पर्यन्त भारत पिछाडीवर राहिला असा समज असलेल्यांनी हे ध्यानात घ्यायला हवं की फाळणीच्या जखमा सोसत आणि कोणतीही उत्पादकता नसलेला हा देश, त्याच्या तीस कोटी आर्थिकदृष्ट्या विकलांग जनतेसकट उभा राहिला तो केवळ नेहरूंनी स्वीकारलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेमुळे. व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेली ईस्ट इंडिया कंपनी आणि तिचं बोट धरून आलेला ब्रिटिश साम्राज्यवाद यांनीच पुढे हा देश आपला गुलाम केला हे नेहरुंना पूर्ण माहीत होतं. म्हणूनच त्या काळात आधीच उद्योजक झालेल्या टाटा, बिर्ला यांच्यासारख्या उद्योगपतींना कसलाही धक्का न लावता, नेहरूंनी पोलाद, तेल, कोळसा, या प्राथमिक क्षेत्रांमधले बडे उद्योग सार्वजनिक क्षेत्रात उभारले होते याची त्यांनी आठवण करून दिली होती.
News English Summery: Worldwide Corona Disease Surrounds News Wherever Corona is being discussed, awareness and measures are being appealed to them. The disease, which started from China, has reached the rural parts of Maharashtra. Against that backdrop, the central and state governments have made important decisions. Among them, several organizations have been ordered to remain closed until March 31. So, tourist destinations have also been avoided. From this, NCP leader and Home Minister Jitendra Awhad has targeted Modi. Minister Jitendra Awhad tweeted and lashed out at Corona, calling on Prime Minister Narendra Modi. Former Prime Minister and late leader Pandit Jawaharlal Nehru is often mentioned in Prime Minister Narendra Modi’s speech. Also, Nehru is said to be responsible for many incidents in the country. Similarly, in the background, Modi is criticized by Congress supporters for targeting Nehru. The trend is constantly seen on social media. Now, Jitendra Awhad has made a satirical tweet. In it, he said, ‘The big statue built by Modi is closed; The hospitals built by Nehru are open 24 hours a day.
News English Title: Story PM Narendra Modi statue closed Nehru built hospitals open 24 hours Minister Jitendra Awhad tweet corona virus Crisis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या