5 May 2024 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार
x

नातवाचा उल्लेख?, दोन्ही बाजूच्या शब्दांचे जसेच्या तसे समजून अर्थ काढल्यास शिंदेच त्यांच्या प्रतिउत्तरात फसतील - सविस्तर वृत्त

CM Eknath Shinde

Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं. यावेळी त्यांनी शिंदेंवर घणाघाती टीका केली. त्यावेळी ते म्हणाले, बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू नगरसेवक, अरे त्याला मोठा तर होऊ दे, शाळेत तर जाऊ देत पण सगळं काही एकालाच… माझ्याकडे पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर टीकेतील वास्तव समजून न घेता भावनिक राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यातील दोन्ही बाजूच्या टीकेतील शब्दांचा अर्थ काढला तर वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रतिउत्तरातून तेच अडचणीत येतील आणि उद्या सत्ताधाऱ्यांनी अतिरेक केल्यास आणि शिवसेनेने ते मुद्देसूद मांडल्यास हा राजकीय खेळही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच पलटेल. चिमुकल्यांना लक्ष करावं असे ठाकरे कुटुंबीय नाहीत आणि शिंदे कुटुंबीय सुद्धा नाहीत. पण दसरा मेळाव्याचे राजकारण फसल्याने ‘भावनिक मुद्यासाठी’ शिंदे गटाचा उपयोग भाजप नेते “राजकीय टूलकिट”साठी करत नाहीत ना अशी चर्चा सुरु झाली आहे.

भावनिक ‘राजकीय टूलकिट’ :
मात्र, सध्याच्या पेचातील राजकीय स्थितीत उद्धव ठाकरे किंवा त्यांची शिवसेना नव्हे तर भाजप नेते त्या चिमुकल्या निरागस बालकाला भावनिक ‘राजकीय टूलकिट’ प्रमाणे पुढे करतेय अशी टीका समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. कारण केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री ते चित्रा वाघ यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांच्या टीकेत आणि शब्दांमध्ये एकवाक्यता दिसते आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत देखील असाच चिमुकल्यांवरून मोठ्या नेत्यांनी राजकारण केले आणि नंतर त्यांची पोलखोल झाली होती. आता समजून घेऊन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शब्दात दिलेली उत्तरं आणि त्याचे अर्थ, ज्यामुळे उलट शिंदे अडचणीत येतील.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते :
सभेतील भाषणात उद्धव ठाकरे म्हणले होते, काय कमी दिलं त्यांना?…बाप मंत्री… कारटं खासदार… कोणाचा आमदार….पुन्हा डोळे लावून बसलेत… नातु नगरसेवक, अरे त्याला मोठा तर होऊ दे, शाळेत तर जाऊ देत, आत्ताच नगरसेवक?… पण सगळं काही एकालाच… माझ्याकडे पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेत कोणता आक्षेपार्य शब्द आहे हाच संशोधनाचा विषय आहे. अगदी ‘अरे त्याला मोठा तर होऊ दे, शाळेत तर जाऊ देत’ यात सुद्धा काय आक्षेपार्य आहे असा प्रश्न पडतो. एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या एका सभेत स्वतःच्या पदाधिकाऱ्याच्या एका बॅनरवरील लहान मुलाच्या फोटोवरून ‘अरे आत्ता पासूनच’ अशी मिश्किल आणि गमतीने टिपणी केली होती. अगदी देशाच्या राजकारणातील हीच ‘कौटुंबिक हायरारकी’ अनेक पक्षात पाहायला मिलते. आणि तोच अर्थ उद्धव ठाकरे यांच्या शब्दातून निघतो आणि त्यात कुठेही चिमुकल्याला जाणीवपूर्वक टार्गेट करणं दिसत नाही.

उद्धव ठाकरेंच्या टीकेतून काय निष्कर्ष :
उद्धव ठाकरेंच्या वाक्यात बाप मंत्री, मुलगा खासदार “तर कोणाचा आमदार” असं सुद्धा आहे. ज्यामध्ये ‘कोणाचा आमदार’ हे सरसकट शिंदे गटाला लागू होतं. राहिला प्रश्न शिंदेंच्या कुटुंबाचा तर त्यात स्वतः शिंदे (मंत्री), मुलगा खासदार आणि नातू (नाव न घेता) नगरसेवक असं म्हटलं. त्यात त्यांनी पुढे असं जोडलं की सर्व राजकीय पद घरात हवी असा त्याचा राजकीय अर्थ निघतो. तसेच उद्धव ठाकरे हे सुद्धा म्हणाले ‘अरे त्याला मोठा तर होऊ दे, शाळेत तर जाऊ देत’ यामध्ये कोणतीही आक्षेपार्य टिपणी किंवा अर्थ दिसत नाही. पण, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला यश आलं आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अपयश जे माध्यमांवर अधोरेखित झाल्याने शिंदे गट आणि भाजप नेते एका भावनिक मुद्याला (निरासग चिमुकल्याला) ‘राजकीय टूलकिट’ प्रमाणे वापरत आहेत असं समाज माध्यमांवर फेरफटका मारल्यावर स्पष्ट होतंय. म्हणजे अगदी केंद्रीय मंत्री ते फडणवीस आणि चित्रा वाघ या सर्वांमध्ये सारखीच एकवाक्यता दिसते आहे.

 

प्रतिउत्तरात शिंदे काय म्हणाले होते :
मी मुख्यमंत्री.. मुलगा म्हणजे श्रीकांत कारट..आणि खासदार…नातू नगरसेवक पदासाठी म्हणून आता डोळा लावून बसलाय…अरे एवढा बच्चू दीड वर्षाचा आहे तो…. रुद्रांष… अरे त्याचा जन्म झाल्यानंतर… तुमचं अध्यपतन सुरु झालं… कोणावर टीका करताय?… त्या डिड वर्षाच्या बाळावर?… अरे तुम्ही मुख्यमंत्री झाले… तुमचा मुलगा मंत्री झाला… आम्ही काय बोललो…?

शिंदेंच्या प्रतिउत्तरातून काय निष्कर्ष :
आता येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं ते थोडक्यात बोलून दाखवताना दिसले. पण चिमुकल्या नातवाच्या बाबतीत बोलताना ओघाच्या भरात दुसरही बोलून गेले. म्हणजे प्रत्येक आजोबासाठी त्यांचा नातू किंवा नातं जिवापेक्षा अधिक असतात आणि त्यांचं या जगातील आगमन हे आई-वडिलांपेक्षही थोडं अधिक आणि भावनिक असतं हे वेगळं सांगायला नको. नातवाचा जन्म होऊन त्या घरात त्याने येणं, याहून अनमोल क्षण आजी-आजोबांसाठी असूच शकत नाही. पण उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर देण्याच्या ओघात शिंदे म्हणाले “रुद्रांषचा जन्म झाल्यानंतर, तुमचं अध्यपतन सुरु झालं”. पण एवढासा चिमुकला कसा काय कोणाच्या अध्यपतनाची सुरुवात असू शकतो? आणि नातवाचा जन्म होणं हा आजोबांसाठी आनंदाचा क्षण आणि त्या आनंदाच्या क्षणीच ते ज्या पक्षाने सर्वकाही दिलं, त्यांच्या अध्यपतनाची तयारी करू लागले असाच त्यांच्या वाक्याचा सरळ अर्थ निघतो. त्यामुळे विश्लेषण केल्यास शिंदेच अडचणीत येतील असं एकूण दिसतंय, अगदी सामान्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा तशाच आहेत. त्यामुळे हा विषय मुळात शिंदे गटाने आणि भाजपने थांबवणं गरजेचं आहे. कारण, शिवसेनेतून यावर कोणी विनाकारण पुढे येतं नाहीत हे सुद्धा दिसतंय.

वास्तविक भावनिक रागाचं कारण काय त्याची चर्चा?
शिंदे गटाचा मेळावा माध्यमांवर पुराव्यानिशी फसल्याने मोठी राजकीय कोंडी झाली आहे, परिणामी त्यात प्रचंड पैसा सुद्धा वाया गेला आहे आणि बंडखोरांबाबत नकारात्मक संदेश जाताना, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्यासोबत पदाधिकारी, शिवसैनिक आणि सामान्य लोकं असल्याचं सिद्ध झाल्याने शिंदे गट आणि भाजप नेते शिंदे यांच्या नातवाचा विषय ‘पॉलिटिकल टूलकिट’ प्रमाणे वापरत असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. प्रसार माध्यमांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर सुद्धा याच वृत्तावरून नेटिझन्सच्या टिपण्या शिंदे आणि भाजप विरोधात असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या विषयाच विश्लेषण केल्यास स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच स्वतःच्या नातवावरून अडचणीत येतील असं दिसतंय. कारण त्यांनी उद्धव ठाकरेंना याच विषयावरून प्रतिउत्तर देताना ओघात जी टिपणी केली तीच धक्कादायक होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Politics over CM Eknath Shinde’s grandson check details 07 October 2022.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x