26 October 2021 4:29 AM
अँप डाउनलोड

भाजप-शिवसेनेच्या राज्यात पेट्रोल दर सेंचुरीच्या दिशेने रवाना, सामान्यांचा खिसा महागाईने जळणार

मुंबई : मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलचे दर वेगाने वाढत वाढत असून हे वाढते दर शंभरी गाठेल अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महागाईसुद्धा प्रचंड वाढणार असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा सामान्यांनाच बसणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आज पेट्रोलचे दर १९ पैशांनी वाढले आहेत तर डिझेल २१ पैशांनी महागले आहे. परिणामी मुंबईमध्ये पेट्रोल ८६.९१ रुपयांवर पोहोचले आहे, तर डिझेलचा दर ७५.९६ रुपये इतका झाला आहे. त्यामुळे हा मुंबईमधील पेट्रोल दराचा नवा उच्चांक आहे. संपूर्ण राज्याचा विचार केल्यास अमरावतीत पेट्रोलचा दर सर्वाधिक असून तो ८८.१७ रुपये इतका झालं आहे. त्यामुळे ग्रामीण भागसुद्धा होरपळून निघाला आहे.

सध्याच्या वाढत्या दरानुसार पेट्रोलचे दर शंभरी गाठतात की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. परंतु त्याचा थेट परिणाम भरमसाट महागाई वाढण्यात होत आहे, त्यामुळे सामान्यांमध्ये प्रचंड रोष पाहण्यास मिळत आहे.

हॅशटॅग्स

BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x