12 December 2024 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Viral Video | भव्य इमारत कोसळली, मात्र त्यातही चिमुकली सुखरूप, चमत्कार दाखवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video |  दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रशासन कायम आपल्याला सतर्क राहण्यास सांगत असते मात्र काही लोक त्या नियमांचे पालन करत नाहीत. दरम्यान, सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. पोलिस आपल्या अकाऊंटवरून अपघातांचे व्हिडिओ व्हायरल करत असतात जेणेकरून लोकांमध्ये सतर्कता यावी. काही अपघात असेही असतात ज्यातून जिव वाचतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

अपघातामध्ये घडला चमत्कार
अनेकदा असे घडते की लोक या जीवघेण्या अपघातांतून चमत्कारिकरित्या बचावतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक इमारत कोसळून तिथे उपस्थित 14 जणांना आपला जीव गमवावा लागला, मात्र तिथे उपस्थित असलेल्या 4 महिन्यांच्या मुलीच्या केसालाही इजा झालेली नाही.

इंटरनेटवर व्हिडीओ झाला व्हायरल
13 सप्टेंबर रोजी, मंगळवारी जॉर्डनयेथील अम्मानमधील जबल अल-वेबदेह येथे चार मजली निवासी इमारत कोसळली. याअपघातामध्ये जवळपास 25 लोक आत अडकले होते, त्यापैकी 14 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचवेळी या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 4 महिन्यांची मुलगी अडकली होती. सुमारे 30 तासांनंतर एका चार महिन्यांच्या मुलीला ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. लोक हा प्रकार बघून आश्चर्यचकित होत आहेत.

इमारत कोसळली तेव्हा आई बिझनेस ऑर्डरसाठी गेली होती
दरम्यान, असे समोर आले आहे की, या लहान चिमुकल्या बाळाची आई इमारत कोसळण्याआधी तिने तिच्या मित्राकडे इमारतीच्या तळघरात सोडून गेली होती. इमारत कोसळली तेव्हा ती तिच्या बिझनेस ऑर्डरसाठी गेली होती आणि इमारतीच्या तळघरात असल्याने मुलीचे प्राण वाचले, असे तज्ज्ञांचे मत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 4 Month Girl was safe even in collapse building Video trending on social media checks details 27 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x