9 August 2022 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | ही म्युचुअल फंड योजना देत आहे भरघोस परतावा, पैसा वेगाने वाढविण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करा Motorola G32 Smartphone | मोटोरोला G32 स्मार्टफोन लाँच, 50 एमपी कॅमेरा, किंमत आणि बरंच काही जाणून घ्या Investment Scheme | रोज फक्त 200 रुपये बचत करा, तुम्हाला 2 कोटी 11 लाख रुपयांचा परतावा मिळेल WhatsApp Updates | व्हॉट्सॲपमध्ये होणार मोठे बदल, या मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स काढू शकणार नाही Jhujjhunwala Portfolio | झुनझुनवाला यांचा आवडता मल्टीबॅगर स्टॉक, या स्टॉकने 30 महिन्यांत दिला 881 टक्के परतावा Viral Video | ऐश्वर्या रायची आणखी एक डुप्लिकेट, एक्सप्रेशन्सचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल 2022 Honda CB300F | 2022 होंडा CB300F भारतात लाँच, किंमत आणि जबरदस्त फीचर्स जाणून घ्या
x

मोदी सरकारवरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह | भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोप | अमेझॉनने टीम भारतात पाठवली

Amazon starts probe corruption

नवी दिल्ली, २० सप्टेंबर | जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अमेझॉन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अमेझॉन कंपनीच्या भारतातील काही कायदेशीर प्रतिनिधींवर भारतीय सरकारला लाच दिल्याचा भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला आहे. अमेझॉन कंपनीने यावर दिलेल्या वक्तव्यामध्ये याची पुष्टी केली नाही आणि या आरोपाचे खंडनही केले नाहीये. पण आपल्या कंपनीमध्ये भ्रष्टाचाराबद्दल कोणतीही सहनशीलता नाहीये, असे ठामपणे सांगितले आहे.

मोदी सरकारवरच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोप, अमेझॉनने टीम भारतात पाठवली – Amazon starts probe after news report claims corruption in India operations :

या सर्व गोष्टींविरुद्ध अमेझॉन कंपनीने एक इन्व्हेस्टिगेशन टीम भारतामध्ये पाठवली आहे. ज्या व्यक्तींविरुद्ध हे आरोप करण्यात आले आहेत, त्या सर्वांना सध्या कामावर हजर राहू नये असे देखील सांगितले आहे. एका विकसनशील देशाच्या सरकारला लाच देणे ही काही छोटी गोष्ट नाहीये. त्यामुळे अमेझॉन कंपनी या सर्व गोष्टीला खूपच सीरियसली घेत आहे असे दिसून येते.

दरम्यान व्यापारी संघटना ‘सीएआयटी’ ने या सर्व प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या विश्वासार्हते संबंधी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. सरकारमधील सर्व स्तरांवर भ्रष्टाचार दूर करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे, असे देखील त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेल्या संबंधित अधिकार्यांची नावे सार्वजनिक करावीत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाही लवकरात लवकर करावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. भारतातील ई कॉमर्स व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती कारवाई वेळेत व्हावी अशी अपेक्षा सीएआयटीने व्यक्त केली आहे.

Amazon Says Zero Tolerance For Corruption Amid Report Of Probe In India :

अमेझॉन आणि फ्यूचर ग्रुप या दोघांमध्ये कायदेशीर संघर्ष आधीपासून सुरू आहेत. त्यामध्ये अमेझॉन कंपनीला फ्युचर ग्रुप किंवा रिलायन्स रिटेल व्हेन्चर लिमिटेड यांच्या पैकी एकासोबत २४७१३ कोटी रूपयांचा करार करायचा आहे. या सर्व गोष्टींवर सुरू असलेल्या वादावरून अमेझॉनने फ्युचर ग्रुपला सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रामध्ये देखील खेचले होते. आरोप करताना अमेझॉनने म्हटले होते की फ्युचर ग्रुपने प्रतिस्पर्धी रिलायन्स रिटेल सोबत करार करून आमच्यासोबतच्या कराराचे उल्लंघन केले आहे. नक्की कोणत्या गोष्टी खऱ्या खोट्या आहेत हे चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Amazon starts probe after news report claims corruption in India operations.

हॅशटॅग्स

#Amazon(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x