30 April 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

SJVN Share Price | अल्पावधीत 291 टक्के परतावा देणारा SJVN शेअर तेजीत येणार? कंपनीने दिली महत्वाची अपडेट

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन म्हणजेच सतलज जल विद्युत निगम या सरकारी जलविद्युत प्रकल्प विकासक आणि ऑपरेटर कंपनीचे शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह 124.30 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील एसजेव्हीएन स्टॉक जोरदार तेजीत वाढत आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

आर्थिक वर्ष 2025 मध्ये एसजेव्हीएन कंपनीने 2,700 कोटी रुपये कमाई करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. तर 2026 या वर्षात कंपनीने 1,000 कोटी ते 1,500 कोटी रुपये कमाईचे लक्ष निर्धारित केले आहे. आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 1.24 टक्के वाढीसह 122.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आर्थिक वर्ष 2023 मध्ये एसजेव्हीएन कंपनीने 2,938 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला होता.

पुढील दोन वर्षांत एसजेव्हीएन कंपनीने 1,176 MW क्षमता जोडण्याची वाढवण्याची योजना आखली आहे. सध्या एसजेव्हीएन कंपनीची स्थापित जल विद्युत निर्मिती क्षमता 1,972 मेगावॅट आहे. तर अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता 404 मेगावॅट आहे. यासह कंपनीने आणखी एक 2,000 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प सप्टेंबर 2024 मध्ये कार्यान्वित करण्याची तयारी केली आहे. एसजेव्हीएन कंपनी पुढील आर्थिक वर्षात 2,900 मेगावॅट क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

मागील आठवड्यात एसजेव्हीएन कंपनीने महाराष्ट्रात 5,000 मेगावॅट क्षमतेचे अक्षय ऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करण्याचा सामंजस्य करार केल्याची बातमी जाहीर केली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 291 टक्के वाढवले आहे. मागील पाच वर्षांत एसजेव्हीएन स्टॉक 480 टक्के मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 170 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 30.39 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 47,825.61 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 22 March 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x