17 November 2019 9:36 PM
अँप डाउनलोड

आता जंक फूड आणि कोका कोलाच्या जाहिरातींना कार्टून चॅनेलवर बंदी.

नवी दिल्ली : लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता जंक फूड आणि कोका कोलाच्या जाहिरातींना कार्टून चॅनेलवर बंदी.

देशात लहान मुलांच्या आरोग्यविषयक समस्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे भारतात आता कोणत्याही कार्टून चॅनेल्स वर जंक फूड आणि कोका कोलाच्या जाहीरांतींवर संपूर्ण बंदी आणली आहे.

केंद्र सरकारने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तसे निर्देशही कोका कोला, नेस्ले आणि अन्य ९ मोठ्या कंपन्यांना दिले आहेत. कार्टून चॅनेल्स म्हणजे लहान मुलांच्या आवडीचा विषय त्यामुळे जाणीवपूर्वक या कंपन्या तशा जाहिराती दाखवतात आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणजे लहान मुले त्या जंक फूडच्या प्रेमात पडतात आणि त्याचे आवडीने सेवनही करतात. त्यामुळेच त्याचे दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर होताना मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या निर्णयाची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी राज्यसभेत दिली.

हॅशटॅग्स

#Junk food Banned(1)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या