नागपूर : विदर्भातील प्रदूषण झपाट्याने वाढत असताना नागपूर जिल्हातील उमरेड येथे आणखी औष्णिक वीज केंद्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. उमरेड मधील एका नाट्यगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री बावनकुळे आणि आमदार सुधीर पारवे मंचावर उपस्थित होते.

कोळसा खाणी आणि औष्णिक वीज केंद्रामुळे आधीच चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली मधील वातावरण प्रचंड प्रदूषित होत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये खाणींविरोधात मोठी आंदोलन झाली, त्यात उमरेड मध्ये आधीच दोन कोळसा खाणी आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषणात वाढ झाली आहे. अशी स्थिती असताना पुन्हा उमरेड मध्येच अजून एक औष्णिक वीज केंद्र आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनाने भविष्यात प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Vidarbha pollution issue