19 July 2019 9:39 AM
अँप डाउनलोड

खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादचे एकमेव खासदार इम्तियाज जलील यांची एमआयएम पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली असल्याचे समोर आले आहे. इम्तियाज जलील औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत.

नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी ऐतिहासिक विजय प्राप्त केला होता. शिवसेनेचे दिग्गज खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत जलील यांनी लोकसभा गाठली होती. विशेष म्हणजे जलील हे वंचित बहुजन आघाडीकडून विजयी झालेले एकमेव खासदार आहेत. तसेच औरंगाबाद विधानसभा मतदार संघाचे आमदार देखील आहेत.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांची एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ही नियुक्ती केली आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#MIM(9)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या