26 April 2024 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार
x

Adani Group Shares | अदानी ग्रुपचे शेअर्स तेजीत! आता नवीन टार्गेट प्राईस जाहीर, 'या' शेअर्सची खरेदी वाढली

Highlights:

  • Adani Group Shares
  • अदानी ग्रीन एनर्जी शेअर
  • अदानी एंटरप्रायझेस शेअर
  • अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर आणि अदानी पोर्ट्स शेअर्स
  • वेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेजने काय म्हटले
  • जेएम फायनान्शियल ब्रोकरेजने काय म्हटले
Adani Group Shares

Adani Group Shares | जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स क्रॅश झाले होते. मार्च 2023 तिमाहीत अदानी समूहातील कंपन्यांच्या नफ्यात आणि विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित निव्वळ उत्पन्न वार्षिक 17 टक्क्यांच्या वाढीसह 9,093.97 कोटी रुपयेवर पोहचले आहे.

एका वर्षापूर्वी अदानी समूहाच्या कंपनीचे उत्पन्न 7,797.71 कोटी रुपये होते. या तिमाहीत अदानी समूहाच्या कंपन्यांची एकत्रित विक्री 12.16 टक्के वाढीसह 81,219.42 कोटी रुपये नोंदवली गेली आहे.

अदानी ग्रीन एनर्जी शेअर

अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने सर्वात जास्त नफा कमावला आहे. तिच्या निव्वळ नफ्यात 319.80 टक्क्यांची वाढ झाली असून आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत कंपनीने 508 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 121 कोटी रुपये होता. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.36 टक्के घसरणीसह 980.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी एंटरप्रायझेस शेअर

नफ्याच्या बाबतीत अदानी ग्रीन कंपनीनंतर अदानी एंटरप्रायझेसचा क्रमांक लागतो. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या नफ्यात मार्च तिमाहीत 137.40 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. वार्षिक आधारावर कंपनीने 722.48 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 2,451.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर आणि अदानी पोर्ट्स शेअर्स

अदानी समूहातील अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर आणि अदानी पोर्ट्स यांनी मार्च तिमाहीत अनुक्रमे 69.63 टक्के, 20.74 टक्के, 12.85 टक्के आणि 5.10 टक्के वाढीसह निव्वळ नफा कमावला आहे. तर दुसरीकडे, एनडीटीव्ही, अदानी विल्मार, एसीसी आणि अंबुजा सिमेंट्स कंपनीने निव्वळ नफ्यात अनुक्रमे 97.56 टक्के, 60.05 टक्के, 40.54 टक्के आणि 2.11 टक्के घट नोंदवली आहे.

वेंचुरा सिक्युरिटीज ब्रोकरेजने काय म्हटले

वेंचुरा सिक्युरिटीज फर्म तज्ञ, अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या व्यवसाय बाबत उत्साही आहेत. पुढील 3-5 वर्षात कंपनीच्या व्यवसायात सकारात्मक वाढ अपेक्षित आहे. अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स आणि अदानी ग्रीन कंपन्याच्या स्टॉक वरही तज्ञ उत्साही आहे.

जेएम फायनान्शियल ब्रोकरेजने काय म्हटले

दरम्यान, जेएम फायनान्शियल फर्मने अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअरवर 850 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.  जेएम फायनान्शियल फर्मच्या मते, मार्च 2023 तिमाहीची उत्कृष्ट कामगिरी आणि सकारात्मक दृष्टीकोन विचारात घेता हा स्टॉक पुढील अल्पावधीत 3-4 टक्क्यांनी वाढेल. 5Paisa चे तज्ञ देखील अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यास सकारात्मक आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Shares today on 02 June 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x