20 April 2024 9:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Child Mutual Fund | होय! तुमच्या मुलांसाठी म्युच्युअल फंड SIP देईल वाढत्या महागाईप्रमाणे परतावा, सय्यम करोडमध्ये रिटर्न देईल

Child Mutual Fund

Child Mutual Fund | एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या रमेशने जेव्हा आपल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करण्याचे ठरवले तेव्हा त्याने आपल्या मुलांच्या भविष्यासाठीही आर्थिक नियोजन करण्याचा विचार केला होता. पण रमेशचा मित्र सुरेशने असे कोणतेच आर्थिक नियोजन केले नाही. आपल्या मुलांच्या जन्मापासून रमेशने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन/SIP द्वारे म्युच्युअल फंड स्कीममध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. याचा फायदा रमेशला असा झाला की त्याचे मूल 20 वर्षांचे झाल्यावर त्याच्या नावावर 1 कोटी रुपये जमा झाले होते. दुसरीकडे, सुरेशने असे कोणतेही नियोजन न केल्याने तो बिचारा हलाखीचे आयुष्य जगत होता.

जर तुम्हीही आपल्या मुलांसाठी आर्थिक नियोजन करू इच्छित असाल तर आता पासून SIP मध्ये गुंतवणूक सुरू करू, जेणेकरून तुमचा मुलगा मोठा झाला की त्याला आपले भविष्य बनवण्यासाठी एक रक्कम जमा झाली असेल. म्हणूनच म्युचुअल फंड सल्लागार नेहमी मुलांच्या भविष्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करण्याची शिफारस करतात. आजच्या जगात, शिक्षण आणि इतर गोष्टी ज्याप्रकारे महाग होत चालले आहे, त्यामुळे मुल मोठे होईपर्यंत आपली आर्थिक बाजू मजबूत करणे खूप गरजेचे आहे. गुंतवणूक बाजारात अशा अनेक म्युचुअल फंड योजना आहेत, ज्यात तुम्ही मुलांच्या नावावर पैसे जमा करू शकता. चाइल्ड म्युच्युअल फंड स्कीम ही मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

उच्च परतावा मिळविण्यासाठी उत्तम पर्याय :
काही म्युच्युअल फंड हाऊस मुलांच्या नावावर गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध करून देतात. त्यापैकी काहींचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. मुलांसाठी गुंतवणूक करताना तुम्ही तुमचे ध्येय दीर्घकालीन ठेवले पाहिजे. SIP मध्ये 15 ते 20 वर्षे गुंतवणूक करता येते. असे अनेक म्युचुअल फंड आहेत ज्यांनी 15 ते 20 वर्षांमध्ये 12 ते 16 टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. तथापि, लक्षात तुम्ही फक्त चाइल्ड फंडमध्येच गुंतवणूक करावी असे कोणतेही बंधन नाही. मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करताना तुम्ही जास्त परतावा देणाऱ्या सर्वोत्तम म्युच्युअल फंडची निवड करू शकता, आणि त्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.

ICICI प्रुडेन्शियल चाइल्ड केअर फंड :
* 20 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर मिळणारा परतावा : 15.71 टक्के
* 20 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य : 18,51,049 रुपये
* SIP गुंतवणुकीवर मिळणारा परतावा : 14 टक्के
* 5000 रुपये SIP चे मूल्य : 70 लाख रुपये
* म्युचुअल फंड खर्चाचे प्रमाण : 2.38 टक्के
* म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता : 889 कोटी
* किमान गुंतवणूक : 5,000 रुपये
* किमान SIP गुंतवणूक रक्कम मर्यादा : 100 रुपये

एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड :
* 20 वर्षात एकरकमी परतावा : 16.85 टक्के
* 1 लाख रुपयांचे गुंतवणुकीचे मूल्य : 22,52,031
* SIP गुंतवणुकीवर मिळणारे रिटर्न : 15.75 टक्के
* 20 वर्षांत 5000 रुपये SIP चे मूल्य : 91.44 लाख
* खर्चाचे प्रमाण: 1.99 टक्के
* एकूण मालमत्ता : 5,968 कोटी
* किमान गुंतवणूक : 100 रुपये
* किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 100 रुपये

टाटा यंग सिटिझन्स फंड :
* 20 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा : 13.58 टक्के
* 20 वर्षात 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य : 12,76,548 रुपये
* SIP गुंतवणुकीवर मिळणारा परतावा : 12.15 टक्के
* 5000 SIP चे मूल्य : 56.72 लाख रुपये
* खर्चाचे प्रमाण : 2.56 टक्के
* एकूण मालमत्ता : 273 कोटी रुपये
* किमान गुंतवणूक : 500 रुपये
* किमान SIP : 500 रुपये

UTI चिल्ड्रन्स करिअर फंड :
* 20 वर्षात एकरकमी परतावा : 11.47 टक्के
* 20 वर्षांत 1 लाख रुपयांचे मूल्य : 8,77,324 रुपये
* SIP रिटर्न : 11.56 टक्के
* 5000 SIP गुंतवणुकीचे मूल्य : 41.12 लाख रुपये
* खर्चाचे प्रमाण : 2.50 टक्के
* एकूण मालमत्ता : 703 कोटी
* किमान एकरकमी गुंतवणूक : 1000 रुपये
* किमान SIP रक्कम : 500 रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Child Mutual Fund Scheme for investment for better future and making huge money on 27 November 2022.

हॅशटॅग्स

Child Mutual Fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x