Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या दरांनी चिंता वाढवली, तुमच्या शहरात 10 ग्राम सोन्याचा नवा दर किती झाला पहा

Gold Price Today | गेल्या काही दिवसांनंतर आता पुन्हा सोन्या-चांदीत तेजी पाहायला मिळत आहे. एकेकाळी सोने ६० हजार आणि चांदी ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. पण आता त्या दिवशी त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला सोने 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्रॅम वर पोहोचली होती. यानंतर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये घसरण झाली, पण आता त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे.

दिवाळीच्या हंगामात सोन्या-चांदीत तेजी

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) आणि सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. 60,000 रुपयांवर आल्यानंतर आता त्यात तेजी दिसून येत आहे. तर चांदीने 72 हजारांचा टप्पा गाठला आहे. सोन्या-चांदीचे दर नुकत्याच झालेल्या विक्रमी पातळीच्या खाली जात आहेत. जाणकारांच्या मते दिवाळीच्या हंगामात सोने आणि चांदीमध्ये वाढ होऊ शकते. त्यांच्या मते, दिवाळीत सोनं 65,000 रुपयांची पातळी गाठू शकतं. चांदीचा दर 80,000 रुपये प्रति किलो असण्याची शक्यता आहे.

सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ

सराफा बाजाराच्या अधिकृत वेबसाइटनुसार, शुक्रवारी सोने आणि चांदी दोन्हीमध्ये वाढ झाली. आज शुक्रवारी सोन्याचे दर 165 रुपयांनी वाढून 60322 रुपये प्रति १० ग्राम झाला आहे. तर चांदीचे दर 1000 रुपयांनी वाढून 72376 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. याआधी गुरुवारी चांदी 71372 रुपयांवर बंद झाली होती.

आज एमसीएक्सवर सोने-चांदीच्या दरात वाढ

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. एमसीएक्सवर सोने 20 रुपयांनी वधारून 60254 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 146 रुपयांनी वाढून 72740 रुपये प्रति किलो झाली. याआधी गुरुवारी एमसीएक्सवर सोने 60234 रुपये आणि चांदी 72594 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे दर :

* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५६००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६११०० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५६०३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६११४० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५६००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६११०० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 56030 रुपये, 24 कॅरेट सोने : 61140 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 56000 रुपये, 24 कॅरेट सोने : 61100 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५६००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६११०० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५६०३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६११४० रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : ५६००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६११०० रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५६००० रुपये, २४ कॅरेट सोने : ६११०० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५६०३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६११४० रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Price Today Update check details on 02 June 2023.