12 December 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या
x

Home Loan EMI Calculator | होम लोन मधून मुक्ती हवी असल्यास 'ही' माहिती नक्की वाचा, फायद्याचा निर्णय घेण्यास मदत होईल

Home Loan EMI Calculator

Home Loan EMI Calculator | प्रत्येक मिडलक्लास व्यक्तीचे स्वप्न असते की, आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. अनेक व्यक्ती स्वतःचं हक्काचं घर मिळवण्यासाठी पैशांची जमवाजमव तसेच विविध प्रकारच्या प्रोसेस करत असतात. काही व्यक्ती डायरेक्ट कॅश देऊन घर विकत घेतात तर, काही व्यक्ती घरासाठी होम लोन घेतात. अशातच होम लोन त्याचबरोबर ईएमआय यांसारख्या गोष्टी सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रत्येक महिन्याला येत असतात. (What is repayment of home loan?)

सध्याच्या महागाईच्या काळामध्ये वाढत्या व्याजामुळे एकतरी ईएमआय वाढत जातो किंवा लोन. यामध्ये दोन्ही बाजूंनी जो व्यक्ती लोन फेडत असतो त्याचे नुकसान होत असते. घराचं कर्ज फेडण्यासाठी अनेक व्यक्तींना भरपूर कालावधी लागतो. अनेक व्यक्ती लवकरात लवकर लोन कशा पद्धतीने फेडता येईल याबाबत अनेक प्रकारच्या दिशा शोधत असतात. आज आम्ही तुम्हाला लवकरात लवकर लोन कशा पद्धतीने फेडता येईल आणि होम लोनचे रिपेमेंट लवकर कशा पद्धतीने होईल याबद्दल काही खास टिप्स सांगणार आहोत. (How is home loan repayment calculated?)

वर्षातून एकदा भरा लोन
तुम्हाला आता होम लोन फेडण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. तुम्ही वर्षातून कमीत कमी एकदा होम लोनचा एक भाग फेडू शकता. यामध्ये तुम्हाला वीस ते पंचवीस टक्के होम लोन फेडण्याची संधी मिळते. ही संधी तुमच्या होम लोन प्रिन्सिपलच्या किमतीला फार कमी करून टाकते. त्यानंतर ईएमआय आणि लोन फेडण्याचा कालावधी कमी होतो. परंतु तुम्ही ही योजना तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्हाला वर्षातून एकदा बोनस मिळेल किंवा कुठूनतरी तुम्हाला खूप मोठी रक्कम मिळेल.

इएमआयची रक्कम वाढवा :
सर्वातआधी लोन घेणाऱ्या व्यक्तीने अशी बँक निवडावी जी सर्वात कमी व्याजदरावर लोन देत असेल. सुरुवातीला हा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण असं केल्याने तुमच्यावरचं एमआयच ओझ थोडं कमी होईल. पुढे जाऊन तुम्ही लोन पेमेंटचा कालावधी कमी करण्यासाठी जरा जास्त प्रमाणात इएमआय फेडू शकता. त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक वर्षी दहा टक्क्यांपर्यंत इएमआय वाढवण्याचा विचार करू शकता.

कमी काळामध्ये लोन फेडण्याचा पर्याय निवडा – (What is the repayment period of housing loan?)
तुम्ही लोन घेतल्यावर त्याची परतफेड करण्यासाठी कमीत कमी वेळेचा पर्याय निवडू शकता. असं केल्याने इएमआय वाढेल परंतू कर्जबाजारी व्यक्तीला कर्ज फेडण्यासाठी लागणारे व्याजचे ओझे कमी करण्यासाठी मदत होईल. असं केल्याने तुमचे लोन लवकरात लवकर फेडले जाईल. (Can I repay full home loan early?)

या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक
* तुम्ही ईएमआय वेळेवर भरले पाहिजे.
* ईएमआय वेळेवर भरले न गेल्याने तुम्हाला त्याचे चार्जेस भरावे लागू शकतात.
* यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर निगेटिव्ह वळणावर जाऊ शकतो.
* एवढेच नाही तर तुम्हाला पुढे जाऊन लोन घेण्यासाठी समस्या येऊ शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Home Loan EMI Calculator process check details on 23 July 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x