22 September 2019 2:07 PM
अँप डाउनलोड

ना खाऊंगा ना खाने दूंगा? योगी सरकारमधील ३ मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना लाच प्रकरणी अटक

लखनऊ : यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील ३ विद्यमान मंत्री निवडणुकीच्या तोंडावर राजकीय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, एका खासगी टीवी वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशननंतर ३ मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक म्हणजे थेट विधानसभेच्या परिसरात हे तीन जण सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देणे आणि कंत्राड मिळवून देण्यासाठी लाच घेताना विधानसभेच्या आवारातच रंगेहात पकडले गेले असा आरोप करण्यात आला आहे. तिघांना सुद्धा कोर्टाने कोठडीत धाडले आहे.

योगी सरकारमधील मागासवर्ग कल्याण मंत्री ओमप्रकाश राजभर यांचे स्वीय सहायक ओमप्रकाश कश्यप, उत्खनन मंत्री अर्चना पांडेय यांचे स्वीय सहायक एसपी त्रिपाठी आणि मूलभूत शिक्षण मंत्री संदीप सिंह यांचे स्वीय सहायक संतोष अवस्थी यांना सदर लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. युपीच्या हजरतगंज पोलिसांकडून ही अटक करण्यात आल्याचे समजते. याशिवाय, योगी आदित्यनाथ यांनी ३ अधिकाऱ्यांचं निलंबन केलं असून त्यांच्या चौकशीसाठी SIT नेमली आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Yogi Government(15)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या