28 June 2022 6:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात
x

विधानसभा, गिरीश बापटांना मनसेच्या रूपाली पाटलांच आवाहन

पुणे : मनसेच्या महिला आघाडी शहराध्यक्षा रूपाली पाटील-ठोंबरे यांना मनसेकडून कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या थेट भाजपच्या गिरीश बापटांना तसेच मनसेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या रवींद्र धंगेकरांना आवाहन देतील.

आगामी निवडणुकीत त्या मनसे सोडून गेलेल्या रवींद्र धंगेकरांना सुद्धा धडा शिकवतील असं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी शहराध्यक्षपदी करण्यात आली असून त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रूपाली पाटील-ठोंबरे या पुण्यातील मनसेच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांच्या त्या आक्रमक स्वभावाचा फायदा पक्षाला होईल असं पक्ष नैतृत्वाला वाटतं त्यामुळेच त्यांना तशा सूचना देणार आल्या आहेत. कसबा मतदार संघातून पालकमंत्री गिरीश बापट हे विद्यमान आमदार आहेत असून ते गेली ५ वेळा येथे निवडून येत आहेत.

कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचं नाव आघाडीवर असून ते मनसेतून काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी मागील निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापटांना कडवी टक्कर दिली होती. भाजपचे गिरीश बापट आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील मत विभागणीचा फायदा मनसेच्या रूपाली पाटील-ठोंबरे यांना सुद्धा होऊ शकतो असं बोललं जात असलं तरी रूपाली पाटील-ठोंबरे या सुद्धा इथे कडवं आवाहन उभं करतील असं पक्षाच मत आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यातील कसाब विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल सुद्धा पाहावयास मिळू शकतात.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x