30 November 2023 4:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर्समधील तेजी कायम राहणार का? तपशील जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर शेअरने 5 दिवसांत दिला 22 टक्के परतावा, पैसा वेगात वाढतोय Gold Rate Today | अरे देवा! आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा दर किती महाग होणार? Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करतोय, 10 महिन्यांत दिला 150% परतावा, शेअरची किंमत उच्चांकी पातळीवर Aster DM Share Price | 1 दिवसात 20 टक्के परतावा देणाऱ्या एस्टर डीएम हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नेमकं कारण काय? OK Play Share Price | मल्टिबॅगर शेअर! ओके प्ले इंडिया शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत, स्टॉक तपशील सेव्ह करा 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! पगारात होणार मोठी वाढ, आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाचे अपडेट
x

स्वतःच गुजरातची तुलना पाकिस्तानसोबत करणाऱ्या फडणवीसांची आदित्य ठाकरेंच्या प्रतिप्रश्नावर केविलवाणी प्रतिक्रिया, पहा काय म्हणाले

DCM Devendra Fadnavis

DCM Devendra Fadnavis | काल वेदांता प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की गुजरात हा देखील देशातीलच एक राज्य असून महाराष्ट्राचा भाऊ असे संबोधले जाते. त्यामुळे हा प्रोजेक्ट काय पाकिस्तानला गेला नाही असेही फडणवीस म्हणाले होते. सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती. त्यामुळे आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते.

दरम्यान, फडणवीसांच्या याच प्रतिक्रियेवर पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “मग वेदांता प्रकल्प गुजरातला न्यायला महाराष्ट्र काय पाकिस्तान होता काय? असा प्रति सवाल आदित्य ठाकरे यांनी फडणीसांना केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांच्याच प्रतिक्रियेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलेलं असताना, दुसऱ्या बाजूला फडणवीसांनी त्यावर केविलवाणी प्रतिक्रया दिल्याने समाज माध्यमांवर त्यांच्या धूर्तपणाची खिल्ली उडवली जातं आहे.

आदित्य ठाकरेंनी पत्रकारांना फडणवीसांच्याच प्रतिक्रियेवर दिलेल्या उत्तरानंतर पत्रकारांनी पुन्हा त्यावर फडणवीस यांना विचारणा केली. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “आदित्य ठाकरे महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करतात याचं मला आश्चर्य वाटतंय. एकदा कंगना राणावत असं काही बोलल्या होत्या. तेव्हा केवढा गजहब झाला होता. आता आदित्य ठाकरे तीच भाषा बोलणार असतील तर मला आश्चर्य वाटतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र बेरोजगारीच्या आणि रोजगाराच्या मुद्यांवर भाजपमध्ये किती अस्वस्थता पसरली आहे हे फडणवीसांच्या केविलवाण्या प्रतिक्रियेतून समोर येतंय अशी चर्चा पत्रकारांमध्ये सुरु झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: DCM Devendra Fadnavis reply on Aaditya Thackeray’s cross question check details 17 September 2022.

हॅशटॅग्स

#DCM Devendra Fadnavis(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x