मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर समाज माध्यमांच्या आडून अनेक वाईट प्रवृत्तीची लोकं एकत्र येऊन आणि पाकिस्तान विरुद्धच्या बिघडलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन भारतात हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली भडकतील अशी कृत्य करत आहेत. याचा संबंध काही राजकीय पक्षांसोबत देखील असू शकतो अशी शक्यता आहे, जे निवडणुकीआधी वातावरण दूषित करू इच्छित आहेत. परंतु, ठरवून सदर कृत्य करताना त्या तरुणांचा मूर्खपणा देखील उघड झाला असून, ते काही तरी हेतूने करत असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.
सदर व्हिडिओ’मध्ये काही तरुण चेहरे झाकून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि भारत देशाला शिव्या देताना दिसत आहेत. परंतु, ते तरुण इतके मूर्ख आहेत की ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि भारत देशाला शिव्या देताना, ज्या घरातून हे कृत्य करत आहेत, ते एका हिंदूच असल्याचं स्पष्ट होतं. कारण त्या युवकांच्या पाठीमागे हिंदूच्या ‘लक्ष्मी मातेची मूर्ती’ स्पष्ट दिसत आहे, तसेच त्या मूर्तीच्या गळ्यात हार देखील असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे एखाद्या समाजाबद्दल द्वेष पसरवण्यासाठी काही तरुण जाणीवपूर्वक हे कृत्य करत असल्याचे दिसते.
मात्र, अशा व्हिडिओच्या आधारे समाज माध्यमांच्या आडून दोन धर्मीयांमध्ये द्वेष पसरवला जाऊ शकतो. त्यामुळे पोलिस यंत्रणांनी देखील योग्य ती खबरदारी घेऊन अशा तरुणांना पहिल्यांदा अद्दल घडवली पाहिजे.
VIDEO: काय आहे तो नेमका व्हिडिओ;
