15 December 2024 4:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

अनेक लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Corona Crisis, Corona Virus, Covid 19

मुंबई, ३१ मार्च: देशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. अशातच ‘काही ठिकाणी नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला.’, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

लव अग्रवाल यांनी पुढे असे सांगितले की, देशामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २२७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये भर पडली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ४४० वर पोहचला आहे. तर २४ तासांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश याठिकाणी प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.’ तसंच, लोकांनी सहकार्य केले नाही तर कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता यावेळी त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या आज २३० वर पोहचली असून यातील १२२ रुग्ण मुंबई आणि ठाणे परिसरातील असल्याने या दोन्ही महानगरांमध्ये अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबई, ठाण्यानंतर पुण्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत करोनाचे ४६ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सांगलीत करोनाचे २५, नागपूरमध्ये १७, अहमदनगरमध्ये ५, रत्नागिरीत १, औरंगाबादमध्ये १, यवतमाळमध्ये ३, साताऱ्यात १, सिंधुदुर्गात १, कोल्हापुरात २, जळगावात १, बुलडाण्यात ३ करोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्राची आणि मुंबईची चिंता वाढवणारी काही प्रकरणं आता हळहळू समोर येऊ लागली आहेत. राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे करोनाचा शिरकाव झाला नसल्याच्या दाव्याला छेद देणाऱ्या घटना मागील काही दिवसात समोर आल्या आहेत. या घटनांतून करोनानं धोकायदायक ठरणाऱ्या कम्यनिटी ट्रान्समिशनमध्येही चंचुप्रवेश केला असल्याचंच दिसत आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Corona virus infection is on the rise in the country and the number of patients is also increasing fast. Similarly, ‘Corona virus infection increased due to lack of cooperation from citizens in some places,’ said Love Agarwal, Joint Secretary at the Ministry of Health, Central. He gave this information during a press conference in Delhi. Love Agarwal further said that in the last 24 hours, there was an increase of 227 new coronary arteries in the country. Coronation figures in the country have reached 1 thousand 440. The three died in 24 hours. One patient died each in Gujarat, West Bengal and Madhya Pradesh. ‘ Also, if people did not cooperate, Corona’s infection could increase further, he said at the time.

 

News English Title: Story Corona virus health ministry said some community do not support News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x