29 March 2024 6:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

कोरोना इम्पॅक्ट: अमेरिकन नौदलाच्या जहाजात १००० खाटांचं रुग्णालय तयार

America Corona Crisi, America Covid 19

वॉशिंग्टन डीसी, ३१ मार्च: जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी जागा अपुऱ्या पडत आहेत. करोनाच्या संसर्गाशी लढण्यासाठी तात्पुरते रुग्णालये, उपचार केंद्र सुरू करण्यात येत असून या अमेरिकन लष्कराची मदत घेण्यात येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला बसला आहे. आता चक्क नौदलाचे १००० खांटांचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहे. गव्हर्नर अँड्रू काओमो यांनी त्याचे स्वागत केले. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत ३१७० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे.

न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी येथील हडसन नदीच्या किनाऱ्यावर जाऊन लोकांनी अमेरिकन नौदलाच्या या कंफर्ट जहाजाचे स्वागत केले. हे एक कन्व्हर्टेड ऑइल टँकर आहे. याला याला पांढरारंग देऊन त्यावर लाल रंगाचा क्रॉस काढला आहे. यासोबतच अनेक सपोर्ट शिप्स आणि हेलिकॉप्टरदेखील येथे आले आहेत. या जहाजात ज्यांना कोरोना नाही, अशा रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.यामुळे येथील इतर रुग्णांलयांतील संसाधने आणि कोरोनाने पीडित रुग्णांसाठी वापरता येतील. न्यूयॉर्क सिटीच्या महापौरांनी ही अगदी युद्धजन्य परिस्थिती असल्याचे म्हटेल आहे.

अमेरिकेत एक लाख ६० हजाराहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. सोमवारी एकाच दिवसात ५४० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकूण ३१७३ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेतील करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे.

 

News English Summary: On the other hand, the US Navy will also be assisted. The Navy’s special ship can accommodate up to 1,000 patients. The vessels will be treated with no coronary obstruction. So that the coronary patients can be treated at the hospital. The vessel has a capacity of 1,200 medical staff, 12 operations theaters, labs, pharmacies and more than 1,000 patients, said New York Governor Andrew Caomo.

 

News English Title: Story Corona virus in USA Army and Naval help to government for fight with corona crisis in New York News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x