12 December 2024 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

देशाची संसद हा जनतेचा आवाज असतो, मात्र संसद भवनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान स्वतःचा राज्याभिषेक समजत आहेत - राहुल गांधी

Highlights:

  • New Parliament Inauguration
  • संसद हा जनतेचा आवाज
  • काँग्रेसची तीव्र शब्दात टीका
  • ही आरएसएसची मानसिकता
Congress leader Rahul Gandhi

New Parliament Inauguration | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तर विरोधी पक्षाचा या कार्यक्रमात सहभाग नाही. उद्घाटन समारंभानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करत या कार्यक्रमाला राज्याभिषेक असल्याचे म्हटले आहे.

संसद हा जनतेचा आवाज
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, ‘देशाची संसद हा जनतेचा आवाज असतो. संसद भवनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान राज्याभिषेक मानत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना या ऐतिहासिक कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

काँग्रेसची तीव्र शब्दात टीका
संसदीय परंपरेचा तिरस्कार करणाऱ्या एका स्वाभिमानी हुकूमशहाने नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले आहे, अशी टीका काँग्रेसने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ही आरोप केला की, राष्ट्रपती पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी द्रौपदी मुर्मू यांना त्यांचे घटनात्मक कर्तव्य पार पाडू दिले जात नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ट्विट केले की, “तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नवीन संसद भवनाच्या पायाभरणी सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आले होते. उद्घाटन समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डावलण्यात आले.

ही आरएसएसची मानसिकता
ही आरएसएसची मागास समाजविरोधी आणि उच्चवर्णीय मानसिकता आहे. त्यामुळेच रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू यांना सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होण्यासाठी योग्य तो सन्मान देण्यात आला नाही. वेणुगोपाल यांनी दावा केला की, कोविंद आणि मुर्मू यांना जाणीवपूर्वक वगळणे हा पुरावा आहे की पंतप्रधान मोदींनी त्यांचा निवडणुकीच्या फायद्यासाठी वापर केला परंतु त्यांना अशा ऐतिहासिक प्रसंगाचा भाग होऊ दिले नाही.

News Title: Congress leader Rahul Gandhi criticized on PM Narendra Modi after new parliament inauguration details 28 May 2023.

हॅशटॅग्स

#Modi and Rahul Gandhi (1)(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x