27 May 2022 5:05 AM
अँप डाउनलोड

भारतावर पाकिस्तानचा क्षेपणास्त्र हल्ला, लष्कराचे ४ वीर जवान शहीद.

जम्मू : पाकिस्तान ने पुन्हां शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेजवळ तुफान गोळीबार आणि तोफगोळ्यांचा प्रचंड मारा केला. पाकिस्तानच्या या हल्यात भारतीय लष्कराचा एक कॅप्टन आणि ३ जवान शहीद झाले. तसेच बीएफएसचा एक जवान आणि २ मुलांसहित एकूण ४ जण सुध्दा जखमी झाले आहेत. नंतर प्रतिउत्तरादाखल भारतीय लष्करानेही जशास तसे उत्तर दिले.

काही दिवसांच्या शांततेनंतर पाकिस्तान ने कुरापती काढत थेट क्षेपणास्त्राचा मारा करत भारतीय लष्कराचे संपूर्ण बंकर फोडले. तसेच भारतीय लष्कराने पूंछ परिसरातील नागरिकांना दिलेल्या सूचनेनुसार नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये असे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या गोळीबारात ७ भारतीय जवान शहीद झाले होते तर ८ स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.

भारतीय लष्कराचे कॅप्टन कपिल कुंडू यांना वयाच्या २३ व्या वर्षीच वीर मरण आले आहे. तसेच सुभम सिंह, रोशनलाल आणि रामअवतार असे ३ जवान शहीद झाले आहेत. कॅप्टन कपिल कुंडू हे मूळचे हरियाणातील रणसिका गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

या हल्याचा जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तीव्र शब्दात निषेध करून शोक व्यक्त केला आहे.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)#Pakistan(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x