22 January 2022 4:04 AM
अँप डाउनलोड

भारतात सर्वाधिक फेसबुक फेक अकाउंट.

मुंबई : फेसबुकने केलेल्या अधिकृत पाहणीत भारतात सर्वाधिक फेक अकाउंट्स असल्याचे उघड झाले आहे. भारतापाठोपाठ फिलिपाइन्स आणि इंडोनेशिया सारख्या विकसनशील देशांचा क्रमांक लागतो. फेसबुक ने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात तब्बल २० कोटी फेसबुक फेक अकाउंट्स आहेत.

अशी फेक अकाउंट्स शक्यतो ‘पापा की लाडली’ किंव्हा ‘एंजल प्रिया’ अशा नावाने बनवलेली असतात, त्यामुळे तुमच्या फ्रेंडलिस्ट मध्ये अशा प्रकारचे नाव असलेले अकाउंट्स तर नाहीत ना याची खात्री करून घ्या.

फेसबुक ने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर २०१६ पर्यंत १.८६ अब्ज युझर्स होते. त्यातील एकूण ११.४० कोटी अकाउंट्स हे बनावट असल्याचे उघड झालं आहे. तर दुसरीकडे डिसेंबर २०१७ पर्यंत जगभरात २.१३ अब्ज युझर्स होते ज्यामध्ये १०% अकाउंट्स हे फेक असल्याचे पाहणीत समोर आले आहे.

हॅशटॅग्स

#facebook(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x