मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक TV'च्या कर्मचाऱ्यांचा छळ | अर्णब पुन्हा हायकोर्टात
मुंबई, 08 डिसेंबर : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक आणि सर्वेसेवा अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कारण काल त्यांना थेट सुप्रीम कोर्टातून धक्का मिळाला आहे. केवळ अर्णब गोस्वामीच नव्हे तर त्यांच्या कर्मचाऱ्यांचे देखील धाबे दणाणले असतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
कारण रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीविरोधातील सर्व FIR रद्द करणे आणि तपास CBI ‘कडे वर्ग करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास काल स्पष्ट नकार दिला होता. सदर याचिका स्वभावत: महत्वाकांक्षी असल्याचे दिसत असल्याचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटल्याने ती अर्णब गोस्वामी यांना चपराक असल्याचं देखील म्हटलं गेलं.
विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी रिपब्लिकच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला अटक करू नये आणि हे प्रकरण CBI’कडे हस्तांतरित करावे अशी आपली मागणी होती. परंतु ही याचिका मागे घेणेच योग्य असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. त्यानंतर याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतली आहे.
त्यानंतर टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली (Arnab Goswami, editor-in-chief of Republic TV, has moved the Mumbai High Court in the TRP scam case) आहे. मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याचा आरोप करत अर्णब यांनी संपूर्ण तपास आणि कायदेशीर कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे.
वाहिन्यांचे रेटिंग वाढवण्याच्या उद्देशाने काहींनी हंसा रिसर्च ग्रुपच्या माजी कर्मचाऱ्यांशी संगनमत करून घोटाळा केला, असा आरोप (Some conspired with former Hansa Research Group employees to raise the ratings of the channels) आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एआरजी आऊटलायर कंपनीच्या रिपब्लिक टीव्हीचाही घोटाळ्यात सहभाग असल्याच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. परंतु, या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांचा जाणीवपूर्वक छळ केला जात असल्याचा आरोप, अर्णब गोस्वामी यांनी विनंती अर्जात केला आहे. एआरजी आऊटलायर ग्रुप आणि स्वतःच्या नावाने आधीच्या प्रलंबित याचिकेत अर्ज दाखल केला आहे.
रिपब्लिक टीव्हीचे पश्चिम विभाग वितरण प्रमुख घनश्याम सिंग यांचा २६ दिवसांच्या कोठडीत प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला. सिंग यांना पट्ट्याने मारलं तसेच कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांना सातत्याने चौकशीसाठी बोलवून छळवणूक केली, असे गंभीर आरोप या अर्जात केले आहेत. तसंच, ‘मुंबई पोलिस आमच्याविरोधात कुहेतूने ही चौकशी करत असल्याने ती स्थगिती करावी आणि तपास सीबीआयकडे सोपवावा’, असंही या अर्जात नमूद केलं आहे.
News English Summary: Arnab Goswami, editor-in-chief of Republic TV, has since moved the Mumbai High Court in the TRP scam case. Arnab has asked the Mumbai High Court to suspend the entire probe and legal proceedings, alleging harassment of Republic TV employees by the Mumbai police.
News English Title: Republic TV editor Arnab Goswami seeks stay against probe by Mumbai Police in TRP scam case News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News