TRP Scam | कृत्रिमरित्या TRP वाढविण्यासाठी करोडो वाटले | हवालाचा वापर
मुंबई, ३ नोव्हेंबर: मुंबई पोलिसांकडून TRP Scam ची चौकशी मोठ्या वेगाने पुढे सरकत आहेत. ज्या वेगाने चौकशी पुढे सरकत आहे त्याच वेगाने धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे. आता TRP घोटाळ्यात प्रचंड प्रमाणात पैशाची अफरातफर तसेच देवाणघेवाण झाल्याची धक्कादायक माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आली. विशेष म्हणजे त्यासाठी चक्क हवालाचा वापर झाल्याने मोठ्या आर्थिक व्यवहाराची माहिती संबंधित आरोपींच्या चौकशीतून समोर येऊ लागली आहे.
मात्र या चौकशीतून रिपब्लिक टीव्हीच्या बाबतीत अजून धक्कादायक माहिती समोर येत असून त्यांच्या भोवतीचा पोलिसांचा सापळा अजून मजबूत होताना दिसत आहे. कृत्रिमरित्या TRP वाढविण्यासाठी जानेवारी ते जुलै या एकूण ७ महिन्यांच्या कालावधीसाठी रिपब्लिक वृत्त वाहिनीकडून तब्बल १ कोटीपेक्षा जास्त रक्कम स्वीकारल्याचे संबंधित आरोपीने मुंबई पोलिसांच्या चौकशीत मान्य केले आहे. विशेष म्हणजे अधिकृत माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात दिली आहे. परिणामी रिपब्लिक टीव्हीची पाय खोलात अडकू लागले आहेत.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता पर्यंत ११ आरोपींना अटक केली आहे ज्यांचा पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात सहभाग होता. त्या एकूण ११ आरोपींपैकी एक आरोपी अभिषेक कोळावडे याने रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचा TRP वाढविण्यासाठी प्रति महिना तब्बल १५ लाख रुपये मिळत होते, अशी धक्कादायक माहिती चौकशीत दिली आहे. यातील काही रक्कम वितरक (डिस्ट्रिब्युटर्स) असलेल्या आशीष चौधरी याच्या क्रिस्टल ब्रॉडकास्ट कंपनीच्या कार्यालयात स्वीकारली असून उर्वरित रक्कम हवाला माध्यमातून आल्याचे त्याने पोलिसांच्या चौकशीत म्हटले आहे.
सदर माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिषेक याच्या घराची आणि आशीष याच्या पोखरण येथील कार्यालयाची झाडा झडती केली. यामध्ये एकूण ११ लाख ७२ हजार रुपये अभिषेक याच्या घरातून तर एकूण २ लाख रुपये अशीष याच्या कंपनी कार्यालयातून पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले. विशेष म्हणजे या घोटाळ्यातील एका आरोपीने माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता अजून दुसऱ्या एका मुख्य आरोपीदेखील माफीचा साक्षीदार होण्याच्या तयारीत आहे. एकूण आरोपींपैकी काही आरोपी माफीचे साक्षीदार झाल्यास मुंबई पोलिसांना इतर आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यास प्रचंड मदत होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
News English Summary: Mumbai Police’s probe into the TRP scam is moving forward at a rapid pace. Shocking information is also emerging at the same pace as the investigation is moving forward. Now, the shocking information that a huge amount of money was embezzled and exchanged in the TRP scam came to light from the interrogation of the accused. What is special is that due to the use of chucky hawala for this, the information of big financial transactions has started coming to the fore from the investigation of the accused.
News English Title: Mumbai Police probe into the TRP scam is moving forward at a rapid pace News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News