25 June 2024 11:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 26 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, Hold करावा की Sell? RVNL Share Price | आता थांबणार नाही हा PSU शेअर, काय आहे अपडेट? यापूर्वी 2100% परतावा दिला Reliance Power Share Price | स्वस्त रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत Suzlon Share Price | ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन शेअर्स खरेदी सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मोठा परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने धाकधूक वाढवली, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? L&T Share Price | L&T सहित हे 5 मजबूत शेअर्स मालामाल करणार, मिळेल 34 टक्केपर्यंत परतावा
x

Kashif Khan on Cruise Drug Party | कासिफ खानचा क्रूझ पार्टीतील नवा व्हिडीओ नवाब मलिक यांच्याकडून पोस्ट

Kashif Khan on Cruise Drug Party

मुंबई, 29 ऑक्टोबर | FTv चा इंडिया हेड कासिफ खानचा नवा व्हिडीओ पोस्ट करून नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. कासिफ खाननेच क्रूझ पार्टीचं आयोजन केलं होतं. तो त्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी क्रूझवर छापा पडला त्या दिवशी तिथे होता. गर्लफ्रेंडसोबत नृत्य करत होता असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही तर कासिफ खान आणि समीर वानखेडे यांचे चांगले (Kashif Khan on Cruise Drug Party) संबंध आहेत हे दोघेही एकमेकांना दहा वर्षांपासून ओळखतात म्हणूनच त्याने पार्टी आयोजित करूनही त्याला अटक झाली नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

Kashif Khan on Cruise Drug Party. The cruise party was organized by Kasif Khan himself. He was there on the day of the cruise. Nawab Malik has claimed that he was dancing with his girlfriend :

‘कासीफ खान कोण आहे, याचा जरा शोध घ्या. तो फॅशन टीव्हीचा भारतातील प्रमुख आहे. त्याचं सेक्स रॅकेट, ड्रग्ज रॅकेट, पॉर्नोग्राफी ही सगळी कामं तो करतो. त्या दिवशी त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. 1300 लोकांचा तपास झाला नाही. रेव्ह पार्टी होणार याची माहिती एक महिना आधीपासून होती. रेव्ह पार्टीचा आयोजक ज्याची पार्श्वभूमी ड्रग्ज व्यापाराशी संबंधित आहे याचा तपास होत नाही. क्रूझवर झाडाझडती होत नाही. त्यांना ताब्यात घेतलं जात नाही. म्हणजेच त्यांचे सबंध आहेत’, असा आरोप मलिक यांनी समीर वानखेडेंवर केला.

कासिफ खान हा एफ टीव्हीचा इंडिया हेड असला तरीही तो सेक्स रॅकेट चालवतो. ड्रग्जची तस्करी करतो असेही गंभीर आरोप नवाब मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले. एवढंच नाही तर आजच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी हे देखील सांगितलं की अशी सगळी पार्श्वभूमी असलेल्या कासिफ खानचे आणि समीर वानखेडेंचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळेच त्याने ही पार्टी आयोजित करूनही त्याला अटक झाली नाही. आता नवाब मलिक यांच्या या नव्या आरोपांना एनसीबी किंवा समीर वानखेडे काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Kashif Khan on Cruise Drug Party video tweet by Nawab Malik.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x