14 December 2024 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या SBI Mutual Fund | बिनधास्त SIP करा SBI फंडाच्या या योजनेत, 17 पटीने पैसा वाढेल, संधी सोडू नका, पैशाने पैसा वाढवा
x

केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप - नवाब मलिक

Nawab Malik Vs KP Gosavi

मुंबई, 29 ऑक्टोबर | गेले तीन आठवडे ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या टार्गेटवर एसीबीचे संचालक समीर वानखेडे होते. पण आता वानखेडेंबरोबर मलिकांच्या टार्गेटवर भाजप देखील आहे. आर्यन खान ड्रग्ज केसला केपी गोसावीच्या फरार होण्याने एक वेगळं वळण मिळालं. आता त्याच केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. तसंच येत्या विधानसभा अधिवेशनात तो नेता कोण?, हे नावंही जाहीर करेन, असं म्हणत मलिकांनी (Nawab Malik Vs KP Gosavi) फटाक्यांची माळ सुरुच ठेवली आहे.

Nawab Malik Vs KP Gosavi. Malik has made a serious allegation that KP Gosavi and the wife of a BJP leader from Maharashtra have a partnership in a private company. Also, in the coming assembly session, Malik will continue to announce the names of the leader :

गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी तुफान बॅटिंग केलीय. दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून ते नवा पॉइंट शोधून काढून वानखेडे, गोसावी यांच्यावर कडाडून हल्ले चढवतायत. कालपर्यंत एनसीबी, वानखेडे यांच्या कारवाईवर शंका उपस्थित करणाऱ्या मलिकांनी आता नवा आरोप करुन बॉम्ब फोडलाय.

7 डिसेंबर रोजी अधिवेशन होणार आहे. त्यावेळी माझ्यावर हल्ले केले जातील. माझ्या जावयाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण आता मी काही बोलणार नाही. मला विषयांतर करायचे नाही. हे जे काही पोपट आहे. त्याचा पोपट केल्यानंतर बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. हिवाळी अधिवेशनात अनेक मोठी नावे उघड होणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. तसंच भाजपच्या कोणत्या नेत्याचे बायकोचे केपी गोसावीच्या कंपनीसोबत पार्टनरशीप आहे, हे मी अधिवेशनार सांगणार असल्याचा ब़ॉम्ब मलिकांनी फोडला.

गोसावी आणि भाजपच्या एका नेत्याची एका खासगी कंपनीत पार्टनरशीप आहे. त्यांची बायको गोसावीच्या एका कंपनीत पार्टनर आहे. मी आता त्यांचं नाव घेणार नाही. विधानसभेत हे नाव सांगू. पिक्चरचा शेवट जो बोगस आणि फर्जी माणूस आहे त्याची नोकरी जाणे, त्याला तुरुंगात टाकणे, हे यंत्रणेच्या माध्यमातून नाही. बोगस सर्टिफिकेटच्या आधारे बोलतोय. पिक्चरचा शेवट केव्हा होईल जेव्हा निरपराध लोक तुरुंगातून बाहेर येत नाही आणि या सर्व केसेसे कशा फेक आहेत हे जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत या पिक्चरचा शोध होणार नाही, असं ते म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Nawab Malik Vs KP Gosavi political explosion will be assembly session said Nawab Malik.

हॅशटॅग्स

#NawabMalik(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x