27 April 2024 8:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

खोट्या जातीच्या दाखल्याने ओबीसींचा अधिकार हिरावणाऱ्या गुजराती उमेदवारासाठी शिंदें गटाची मराठी उमेदवाराविरोधात धडपड

Andheri East By Poll Assembly Election

Andheri East By Poll Assembly Election | शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करण्यात आला असल्याने पुढील आदेशापर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्य-बाण हे पक्षचिन्ह गोठवलं आहे. तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही, असे आदेश आयोगाने दिले आहेत. शनिवारी रात्री उशीरा आयोगाने याबाबतचे आदेश जारी केले.

यासोबतच अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना तात्पुरत्या स्वरुपात नवीन नाव, नवीन चिन्ह या गोष्टींची माहिती १० ऑक्टोबरपर्यंत आयोगाला कळविणास सांगितले आहे. दोन्ही गटांना नावाचे आणि मुक्त चिन्हामधील चिन्हांचे आपल्या आवडीनुसार आणि प्राथमिकतेनुसार तीन पर्याय १० ऑक्टोबर पर्यंत देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. यानंतर आयोगाकडून दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह देण्यात येणार आहे.

गुजराती उमेदवाराचा खोट्या कागदपत्राद्वारे ओबीसी दाखला :
भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. मुरजी पटेल यांच्या पत्नी केशरबेन २०१२ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेविका होत्या. २०१५ मध्ये पटेल दाम्पत्याने काँग्रेस सोडून भाजपचा झेंडा हाती धरला. त्यानंतर २०१७ ची महापालिका निवडणूक जिंकली, मात्र २०१८ मध्ये बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात दोघांचंही नगरसेवक पद रद्द झालं होतं.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांची निवडणूकपूर्व युती असल्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. यामुळे नाराज झालेल्या पटेल यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन केल्यामुळे ही खरंच बंडखोरी आहे की पक्षाच्या संमतीने अपक्ष लढवलेली निवडणूक, असा सवालही विचारला जात होता.

खोट्या कागदपत्राद्वारे ओबीसी दाखल्याने ओबीसींचा हक्क गेला तरी शिंदेंचं समर्थन :
सध्या शिंदे हे भाजपच्या सांगण्यावरून शिवसेनेच्या विरोधात राजकारण करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे. मात्र शिंदे गटाच्या एकूण हालचाली पाहता त्या भाजपाला पोषक असल्याचं सिद्ध होतंय. कारण अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार नसेल आणि भाजपचा उमेदवार असणार आहे हे निश्चित झालं आहे. मग जर मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनवर कमळ असणार आहे तर मग शिंदेंनी हा हट्ट का केला असाच प्रश्न उपस्थित होतोय. तसेच शिवसेनेच्या अधिकृत मराठी महिला उमेदवाराला पाडण्यासाठी शिंदे थेट गुजराती उमेदवाराच्या पाठीशी आहेत हे दिसतंय आणि त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे या उमेदवाराने खोट्या कागदपत्रांच्या आधारे ओबीसी दाखला बनवला होता आणि जो न्यायालयाने रद्द केल्याने मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांचं नगरसेवक पद रद्द केलं होतं. त्याच उमेदवाराला आता शिंदे गट पाठिंबा देणार म्हणजे हा थेट ओबीसींचे अधिकार हिरावून घेणाऱ्याला पाठिंबा आहे असंच म्हणावं लागेल.

News Title: Andheri East By Poll Assembly Election latest updates 09 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x