19 March 2024 1:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TCS Share Price | टीसीएस शेअर्समध्ये मोठी घसरण सुरु, कंपनीच्या मोठ्या निर्णयाने शेअर पुढे किती घसरणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेटने शेअरवर परिणाम, शेअरची प्राईस खूप घसरणार? IPO GMP | स्वस्त IPO शेअरने लॉटरी लागली! एकदिवसात 101 टक्के परतावा मिळाला, गुंतवणूकदार मालामाल IRFC Vs RVNL Share Price | रेल्वे सेवा संबंधित शेअर्स खरेदी करावे? 1 वर्षात मल्टिबॅगर परतावा दिला, पण पुढे काय होणार? Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर Reliance Power Share Price | 23 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवतोय, सकारात्मक अपडेटने स्टॉक तेजीत Mutual Fund SIP | पगारदारांनो! महिना 3000 रुपयांची SIP बचत देईल कोटी मध्ये परतावा, रक्कम जाणून घ्या
x

स्वाभिमान पक्षाने नाणार प्रकल्प 'समर्थकांची' पत्रकार परिषद उधळली

मुंबई : कोकणच्या आणि नाणारच्या भूमीशी काही संबंध नसलेले सामाजिक कार्यकर्ते अजयसिंग सेंगर यांची मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेली पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.

नाणार प्रकल्प झाला पाहिजे असे जाहीर समर्थन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते अजयसिंग सेंगर यांना चांगलाच दणका मिळाला. मुंबईतील मराठी पत्रकार संघात आयोजित परिषदेत त्यांना उपस्थित पत्रकारांनी आपण कुठल्या गावचे आहात ? आपली जमीन या प्रकल्पात जाणार आहे काय ? असे प्रश्‍न उपस्थित केले. परंतु त्याला एकही समाधानकारक उत्तर आयोजका कडून मिळालं नाही.

परंतु नाणारच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद आयोजित करणाऱ्या ह्या लोकांचा काहीच संबंध नसून, हे सर्व बाहेरचे लोक आहेत असा आरोप करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते तेथे झेंडे घेऊन थेट आत शिरले. परंतु काही जणांनी थेट पोलिस ठाण्यात दूरध्वनीवरून तक्रार केली. परंतु त्याआधीच सर्व प्रकार आटोपला आणि नंतर सेंगर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना झाल्या प्रकारचा निषेध नोंदवला.

सेंगर म्हणाले की, प्रकल्प आम्ही कोणत्याही परिस्थितीत गुजरातमध्ये जाऊ देणार नाही. कोकणातील भाजप नेते प्रमोद जठार यांनी हा मंच स्थापन केला आहे असा थेट आरोप वालम यांनी केला आहे. मुळात सामाजिक कार्यकर्ते अजयसिंग सेंगर यांचा कोकण आणि नाणार बरोबर नक्की नातं काय हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x