19 September 2021 5:16 AM
अँप डाउनलोड

पेट्रोल आणि डिझेल भाव भडकले !

मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मुबईमध्ये लिटरमागे पेट्रोलचा भाव ८२ रुपये ५२ पैसे इतका झाला असून डिझेल प्रति लिटरमागे ७० रुपये २४ पैसे इतका आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यास राजी नसल्याने सामान्य नागरिकांना तुर्तास तरी दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.

व्हेनेझुएलातील देशाअंतर्गत समस्या, अमेरिका-इराणमधला अण्वस्त्रावरुन वाढता तणाव आणि जागतिक मागणीत झालेली प्रचंड वाढ यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव प्रति बॅरल ८० डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. तर दुसरीकडे तज्ज्ञांनी तर कच्चा तेलाचे दर १०० डॉलरच्या घरात जाऊ शकतात अशी भीती व्यक्त केली असून त्यामुळे महागाईत सुद्धा प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1650)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x