13 August 2022 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा Numerology Horoscope | 13 ऑगस्ट, अंकशास्त्रानुसार शनिवारसाठी तुमचा लकी नंबर, शुभ रंग आणि दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मोदींकडून अपेक्षित होते; पण हे काय अंधार करा आणि बॅटरी पेटवा; देशाला....

Minister Jitendra Awhad, Corona Crisis, Covid 19

मुंबई, ३ एप्रिल: कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे.

कोरोनाच्या संकटामुळे देशातील गरीब भावंडांमध्ये नैराश्येचं वातावरण आहे, म्हणूनच त्यांना निराशेतून आशेकडे न्यायचं आहे. दारात एक दिवा लावताना आपण या लढाईत एकटं नाही असं एकमेकांना सांगून निराशेचा अंधकार दूर करण्याचा संकल्प करायचा आहे असंही मोदींनी सांगितलं मात्र हे करत असताना कोणीही एकत्र यायचं नाही किंवा रस्त्यावर जमायचं नाही, सोशल डिस्टन्सचं भान ठेवून प्रत्येकानं अनुकरण करायचं आहे असाही संदेश त्यांनी देशवासीयांना दिला आहे.

दरम्यान, यावरुन कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीका केली. देशाला इतकंही मुर्खात काढू नका, अशा शब्दांत आव्हाड मोदींवर बरसले. ‘भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही, असं भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी ह्या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,’ असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं. मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा मी गरिबांना दान करेन, असं आव्हाड म्हणाले आहेत.

 

News English Summary: Meanwhile, cabinet minister and nationalist leader Jitendra Awhad criticized Modi for this. In such words, do not make the country so foolish. ‘India invented vaccine against Corona, no one will let the mask down. We stand behind the doctor. Modi expected that no poor starvation would fall asleep. So they decided to make this crisis an event as well. Say … darken and burn the battery. Don’t fool the country too much, ‘Awhad said in a tweet. Instead of lighting a candle, I would rather donate to the poor, Avhad said.

 

News English Title: Story corona virus Minister Jitendra Awhad slams PM Narendra Modi over appeal light 9 PM 5th April Covid 19 News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x