15 December 2024 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

आता रस्त्यावर येऊन आग नाही लावली म्हणजे झालं - खा. संजय राऊत

Corona Crisis, Covid 19, MP Sanjay Raut

मुंबई, ३ एप्रिल: कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे.

कोरोनाच्या संकटामुळे देशातील गरीब भावंडांमध्ये नैराश्येचं वातावरण आहे, म्हणूनच त्यांना निराशेतून आशेकडे न्यायचं आहे. दारात एक दिवा लावताना आपण या लढाईत एकटं नाही असं एकमेकांना सांगून निराशेचा अंधकार दूर करण्याचा संकल्प करायचा आहे असंही मोदींनी सांगितलं मात्र हे करत असताना कोणीही एकत्र यायचं नाही किंवा रस्त्यावर जमायचं नाही, सोशल डिस्टन्सचं भान ठेवून प्रत्येकानं अनुकरण करायचं आहे असाही संदेश त्यांनी देशवासीयांना दिला आहे.

दरम्यान, यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना तसेच त्यांच्या समर्थकांना टोला लगावला आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते आता आग नाही लावली म्हणजे झालं. साहेब कामाचं आणि लोकांच्या पोटा पाण्याचं बोलां….असं म्हणत राऊतांनी मोदी समर्थकांची खिल्ली उडवली आहे.

 

News English Summary: Meanwhile, Shiv Sena MP Sanjay Raut has lashed out at Modi and his supporters. While tweeting about this, he said, “When people asked to clap, the people came to the streets and played drums. Now they did not set fire.”

 

News English Title: Story Shivsena MP Sanjay Raut criticized Modi over announcement on Sunday during Corona Crisis News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x