...तर पोलिसांच्या कुटुंबियांना मिळणार ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान - उपमुख्यमंत्री
मुंबई, ३ एप्रिल: मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. धारावीतील एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धारावीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यात काही पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मात्र राज्य सरकारने यावर काही तरतुदी देखील करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील पोलिस दल कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनाची लागण झाल्यामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ, आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने देण्यात यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
News English Summary: The police force in the state is contributing to the fight against the Corona virus. An official grant of Rs 50 lakh will be provided to his family in case of unfortunate death due to coronary infection of a police officer while on duty. State Deputy Chief Minister Ajit Pawar gave this information on Friday. The decision was taken at a meeting held in the ministry chaired by Ajit Pawar. Home Minister Anil Deshmukh, Health Minister Rajesh Tope, Additional Chief Secretary Manoj Sonik and senior officials of Finance, Health and Industry were also present at the meeting. It was also decided that the remaining wages of March should be given priority to the departments of the public health, medical education, police, who are at the forefront of the fight against the corona virus.
News English Title: Story if any police dies due to Covid 19 his family Members will get 50 lakhs Aid says Deputy CM Ajit Pawar News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Metro Job | आता मेट्रोमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण; अर्ज प्रक्रिया, पगार आणि पात्रता काय असेल जाणून घ्या