मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पहिला राजीनामा देणारे कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंनी मातोश्री भेटीसाठी आले असता त्यांना भेट नाकारली होती. जाधव मुंबईमध्ये आले असता त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वेळ मागितली होती, परंतु उद्धव ठाकरे यांनी जाधवांना भेटण्यास नकार दिला होता. या नकाराचं कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यामागे वेगळेच राजकीय तर्क लावले जात आहेत.

काल मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शिवसेनेच्या आमदारांची मुंबईमध्ये मातोश्रीवर बोलाविण्यात आली होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही महत्वाची बैठक काल दुपारी पार पडली होती. या बैठकीतच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेना भाजपसोबत अशी अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली.

काल हर्षवर्धन जाधव यांनी काल मुंबईत मंत्रालय जवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केलं होत. या सरकारमुळेच माझ्यावर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आल्याचं जाधव म्हणाले तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी थेट मागणी सुद्धा हर्षवर्धन जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

कालच्या घडामोडी अशा असल्यातरी मुंबईमध्ये येऊन सुद्धा मातोश्रीने हर्षवर्धन जाधव यांना भेट का नाकारली यावर वेगळेच राजकीय तर्क-वितर्क लढविले जात आहेत. तरी मातोश्री हर्षवर्धन जाधव यांच्यावर का नाराज आहेत यामागील खरं कारण समजू शकलं नसलं तरी काही स्थानिक राजकीय विश्लेषक यामागे खासदार एकनाथ जाहीर यांच्याशी असलेल्या राजकीय वादाचे कारण पुढे करत आहेत.

Why shivsena chief is angry on Kannad MLA harshavardhan Jadhav