18 June 2021 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिवसेनेने, काँग्रेस-एमआयएम'च्या पुढे जाऊन हिंदुत्वाविरोधात काम करायला सुरुवात केली आहे - गिरीश महाजन मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी
x

राजकारणापलीकडचे नितीन गडकरी | तुम्ही ‘प्रस्ताव पाठवा बाकी मी बघतो' म्हणाले होते आणि मनसेची मोठी मागणी मार्गी

Union minister Nitin Gadkari

डोंबिवली, ५ मे | डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा असा रेल्वे समांतर रस्त्याचा प्रश्न सन २००९ पासून प्रलंबित आहे. या रस्त्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करुन एमएमआरडीएने ९३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर या रस्त्याचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला असून अद्यापही गती मिळालेली नाही.सध्या कोरोनामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे रस्ते वाहतुकीचे महत्त्व सर्वांना कळू लागले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दिवा, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली परिसरातील नागरिकांना कल्याण-शिळ रस्त्यावर अवलंबून रहावे लागत असून या रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी होत असते. या परिसरातील वाढत्या नागरिकरणामुळे भविष्यात कल्याण शिळ रस्त्यावरुन पायी चालायला जागा उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल.त्यामुळे डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्ता अत्यंत आवश्यक आहे. या मागणीसाठीच मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती.

त्यावेळी ‘प्रस्ताव पाठवा बाकी मी बघतो, तसेच एखाद्या जवळच्या राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या रस्त्याला निधी देतो’असा शब्द त्यांनी दिला होता,तो पूर्ण केला असं स्वतः मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं आहे. यासाठी गडकरींच्या केंद्रीय परिवहन खात्याने तब्बल ४८ कोटी ६१ लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मनसेने देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जाहीर आभार मानले आहेत.

 

News English Summary: Due to increasing urbanization in the area, there will be no space for pedestrians on the Kalyan Shil road in future. MNS MLA Raju Patil had met Union Minister Nitin Gadkari for this demand.

News English Title: Union minister Nitin Gadkari approved fund for Dombivali Kopar Diva Mumbra road news updates.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(72)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x