14 May 2021 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
दिल्लीकरांसाठी देवदूत ठरलेल्या बी श्रीनिवास यांच्याविरोधात क्राईम ब्रांच फेरा | मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा संताप 91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये तुमच्या तिथे चहात बिस्किटं बुडत असतील, आमच्याकडे चहातंच पूर्ण देश बुडाला - काँग्रेस प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री गायब - संजय राऊत कोरोना आपत्ती | जाहीर आकडेवारी पेक्षा भारत आणि मेक्सिकोमध्ये दुप्पट मृत्यू - अमेरिकन इंस्टीट्यूटचं विश्लेषण राज्य सरकारचं शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटलं, पंतप्रधानांची वेळ मागणार असल्याचे जाहीर होताच.... मराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल
x

मोदीजी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखा आणि संयम बाळगा : मनमोहनसिंग

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिगर भारतीय जनता पक्ष शासित राज्यांमध्ये भाषणादरम्यान थोडा संयम बाळगायला हवा. पंतप्रधानांनी त्यांच्या आचरणातुन नेहमी इतरांसाठी उदाहरण समोर ठेवले पाहिजे. तसेच त्यांची एकूण वर्तणूक ही पंतप्रधानपदाला सुद्धा साजेशी असली पाहिजे, असा सल्ला माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी लिखित ‘फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाइम्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मनमोहन सिंग यांनी हे विधान केले आहे. त्यांनी या भाषणादरम्यान मौलिक आणि अनुभवी सल्ला दिल्याचे म्हटले जात आहे. सध्या ५ राज्यांमधील विधानसभेतील प्रचार शेवटच्या टप्यात असताना मोदी प्रचार सभेत वाट्टेल ते बोलत आहेत असं एकूण चित्र निर्माण झालं आहे. विकासावर बोलण्यापेक्षा ते आई – वडील अशा वैयक्तिक विषयांना हात घालून भावनिक वातावरण करत आहेत आणि त्यामुळे प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा मोदींवर तुफान टीका केली जात आहे.

त्यामुळेच मनमोहन सिंग म्हणाले की, “मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा बाळगायला हवी”. कारण सध्या ज्या राज्यांत विधानसभेच्या निमित्ताने प्रचार सुरु आहे तेथे प्रचारसभांमध्ये खालच्या स्तराची भाषा वापरली जात आहे, असं स्पष्ट दिसून येत आहे.

हॅशटॅग्स

#Congress(489)#Narendra Modi(1538)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x