15 August 2022 12:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Xiaomi CyberOne Robot | शाओमीने तयार केला स्मार्ट रोबोट, काम करताना मनुष्याच्या भावनेनुसार विचार करू शकणार Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा Horoscope Today | 15 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 2023 Kia Ray | 2023 किआ रे कार लाँच, जबरदस्त लूकसह मिळणार शानदार असे फीचर्स Viral Video | तो बाईक सहित खड्ड्यात पडला की खड्ड्यातून वर आला?, विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
x

बेवारस बॅगमुळे नवी मुंबईत खळबळ, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

high alert, mumbai police, bomb squad, maharashtra, surgical strike 2, air strike, pulwama attack, maharashtranama, marathi newspaper, digital newspaper

नवीमुंबई सानपाडा येथे पालिकेच्या मराठी शाळेच्या शेजारी लोकवस्ती असलेल्या भागात अनोळखी बॅग सापडली आहे. याची माहिती मिळताच पोलीस, बॉम्बशोधक पथक, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दहशतवादी मुंबईवर हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर संस्थानी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर अनोळखी बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी हि माहिती आधीच प्रसारित केली असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना हाय अलर्ट दिला आहे. तरीही आपण सुजाण नागरिक म्हणून आपल्या सभोवताली होणाऱ्या संशयित हालचालींची माहिती पोलीस यंत्रणांना लगेचच द्यावी. मुंबई मध्ये शाळेच्या बसेस, लहान मुलांचं अपहरण आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्ब स्फोट अशा काही संभावित घटना दहशदवाद्यांकडून होऊ शकतात.

भारताने केलेल्या एअर स्ट्राईक मध्ये मसूद अजहरचे कुटुंब उध्वस्थ झाले असल्याचे वृत्त आहे. आणि हा एअर स्ट्राईक पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. म्हणूनच पाकिस्तान दहशदवाद्यांच्या मदतीने भारताच्या प्रमुख शहरात आत्मघातकी हल्ले घडवू शकतो अशी माहिती आहे.

हॅशटॅग्स

#HighAlert(2)#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x