26 March 2023 5:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

मुंबईसह राज्यात हाई अलर्ट, दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात

High alert, pulwama attack, pakistan, School buses, school children hijacking, best buses, mumbai railway, public places, digital newspaper, maharashtranama, marathi newspaper

पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर भारत – पाकिस्तान तणाव आणखीनच वाढला आहे. काश्मीरमध्ये सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून जम्मू, श्रीनगर, पठाणकोट येथे विमानतळांवरून प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे आहि हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांनी सर्वाधिक धोका मुंबईला असल्याचे म्हटले जात आहे. दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात. त्यामुळे राज्यातही हाय अलर्ट जारी केला आहे.

सार्वजनिक वाहतूक किंवा सार्वजनिक स्थळांना सर्वात जास्त धोका जारी केला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या मते बसेस, रेल्वे आणि गर्दीची ठिकाणं दहशदवाद्यांकडून टार्गेट केली जाऊ शकतात. अर्थातच याची उपाययोजना म्हणून महाराष्ट्र पोलीस सतर्क आहेत आणि संभावित ठिकाणी गस्त वाढवली आहे. परंतु आपली नैतिक जिम्मेदारी म्हणून प्रत्येक नागरिकाने सतर्क राहावे आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या संशयित हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी.

भारत सरकारने काल हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी परराष्ट्र सचिवांना पुढे करून आम्ही हे एअर स्ट्राईक केले असून आम्ही फक्त दहशतवादी तळाला टार्गेट केलं आहे. आमच्या हल्ल्यात कोणत्याही सामान्य पाकिस्तानी नागरीक किंवा सैनिकाला आम्ही इजा केली नाही. जागतिक कायद्यानुसार कलम ३५A नुसार आम्ही आमच्या देशाच्या आत्मरक्षणासाठी हे पाऊल उचलले आहे. या कॅम्पमध्ये ४२ दहशतवादी आत्मघातकी प्रशिक्षण घेत होते आणि त्यांच्याकडून आमच्या देशाला धोका होता म्हणून आम्ही हे स्ट्राईक केले.

भारताची हि नीती उत्तम होती आणि अमेरिकेने देखील याचे समर्थन केले. परंतु पाकिस्तानने आपल्यावर हलला केला तर त्यांना आंतरराष्ट्रीय परिषदेत याचे उत्तर द्यावे लागेल आणि त्याचे उत्तर त्यांच्याकडे नक्कीच नसेल. म्हणूनच पाकिस्तान दहशदवाद्यांचा वापर करून जास्तीत जास्त हल्ले भारताच्या अंतरिम भागात करू शकतो. म्हणजे बसेस, रेल्वे, सार्वजनिक ठिकाणं, गर्दीची ठिकाणं टार्गेट होऊ शकतात.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x