25 April 2024 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय
x

भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा

Pakistan, hindustan, india, bharat, air strike, pulwama attack, indian air force, pakistan air force, digital newspaper, maharashtranama, marathi newspaper

श्रीनगर, 27 फेब्रुवारी : सकाळी आलेल्या वृत्तानुसार भारतीय हवाई दलाचे १ विमान अपघाताने कोसळले असल्याची बातमी ताजी असतानाच “आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे” असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला.

भारतीय हवाई दलाचं विमान जम्मू-काश्मीरमधील बडगाम इथे कोसळले असून या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर आता हवाई दलाची टेक्नीकल टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारताच्या हवाई हल्ल्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच असून जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उध्वस्थ केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे.

भारताने पाकिस्तानस्थित दहशदवादी तळावर हल्ला केल्यापासून पाक कडून सतत गोळीबार सुरु आहे. आणि या करणामुळे जम्मू-काश्मीरची जनता भयभीत आहे. त्यांच्या मते एकदाचा काहीतरी सोक्षमोक्ष लावा कारण आम्ही आणि आमचं कुटुंब सतत भीतीच्या सावटाखाली जगतो आहे.

पाकिस्तान जनरल आसिफ गफूर यांनी केलेले ट्विट – सविस्तर

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x