13 December 2024 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना व्हायचयं उपपंतप्रधान?

K Chandrasekhar Rao, Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : लोकसभा निकालानंतर देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास भाजप व्यतिरिक्त तयार झालेल्या महायुतीला पाठिंबा देण्यासाठी आपण तयार असल्याचा इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. परंतु त्यासाठी केसीआर यांनी उपपंतप्रधानपदाची अट घातली असून त्यासाठी हालचाल सुरू केली आहे.

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण विरोधकांसोबत संपूर्ण सक्रीय सहभाग देण्यास तयार आहोत. परंतु यासाठी आपली एक अट असून विरोधाकांनी आपल्याला उपपंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करावे, असंही केसीआर यांनी सांगितले. प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार उपपंतप्रधान पदासाठी केसीआर विरोधकांमध्ये सक्रीय झाले आहे. २१ मे रोजी दिल्लीत विरोधकांची बैठक होणार असून त्या बैठकीला देखील केसीआर उपस्थित राहणार आहेत. केसीआर यांची मागणी काँग्रेस नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसने केसीआर यांच्या फॉर्म्युल्यावर बोलण्यास नकार दिला आहे. या सर्व बाबींवर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच चर्चा करण्यात येईल, असंही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान काँग्रेसनेते केसीआर यांच्या संपर्कात आहेत. तर केसीआर यांनी देखील आपण भारतीय जनता पक्षासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. स्वत: राष्ट्रीय राजकारणात येऊन मुलाकडे तेलंगणाची कमान सोपविण्याचा केसीआर यांचा इरादा आहे. तर आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगमोहन रेड्डी यांनी आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x