13 December 2024 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Money From Shares | बाब्बो! 100% ते 295% परतावा देत आहेत हे 5 शेअर्स, खरेदीनंतर संयम आयुष्य बदलेल, सेव्ह लिस्ट

Money From shares

Money From Shares | जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या कंपनीच्या स्टॉकबद्दल मूलभूत आणि तांत्रिक बाबी लक्षात घेऊन पैसे लावले, तर प्रॉफिट मिळणार हे नक्की. बऱ्याच वेळा शेअर बाजारातील कंपन्या अल्पावधीत परतावा देऊन शकत नाही, मात्र दीर्घ मुदतीत या कंपन्या बंपर परतावा कमावून देतात. आज या लेखात आपण अशा काही कंपन्यांची माहिती घेणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

त्रावणकोर फर्टीलायझर अँड केमिकल्स लिमिटेड :
मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 295 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. त्याच वेळी एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांना आतपर्यंत 57.11 टक्के परतावा मिळाला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे मागील एका महिनाभरात या कंपनीच्या शेअरनी मजबूत कमाई करून दिली आहे. अवघ्या एका महिन्यात या शेअर्सची किंमत 40 टक्क्यांनी वाढली आहे.

अपार इंडस्ट्रीज :
मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एक वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना आता 131.28 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1727 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 556.25 रुपये होती.

 बँक ऑफ महाराष्ट्र :
मागील काही आठवड्यात PSU बँकाच्या शेअर्स मध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्र च्या शेअर्समध्ये तेजी स्पष्टपणे दिसून येत आहे. या दरम्यान कंपनीच्या शेअर्सची किंमत 18 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. त्याच वेळी , ज्या लोकांनी एक महिनाभरापूर्वी या बँकेचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना आतपर्यंत 48.27 टक्के नफा झाला आहे. या बँकेने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 60 टक्क्यांहपेक्षा अधिक वाढली आहे.

BLS इंटरनॅशनल :
मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 243 टक्क्यांचा मजबूत परतावा मिळवून दिला आहे. एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आतापर्यंत 285 टक्क्यांनी वाढले आहे.

इंडियन ओव्हरसीज बैंक :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 52.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या 5 वर्षात इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअरमधे 36 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे ज्या लोकांनी या बँकेच्या शेअर्समध्ये 6 महिन्यांपूर्वी पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 86.49 टक्क्यांनी वाढले आहे. एक वर्षभरापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकवर पैज लावली होती, त्यांना आतपर्यंत 43 टक्क्यांचा मजबूत परतावा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Top Five shares which are fundamentally strong and given huge Return in short term on 15 December 2022

हॅशटॅग्स

Money from Shares(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x