14 December 2024 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या
x

IPO GMP | लॉटरी लागेल पहिल्याच दिवशी, स्वस्त IPO आला, GMP चा धुमाकूळ, अशी संधी सोडू नका

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबुत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. एम्फोर्स ऑटोटेक कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 23 एप्रिल 2024 ते 25 एप्रिल 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. ( सार्वजनिक प्रस्ताव )

या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 93 ते 98 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीचा IPO अजून उघडला नाहीये, मात्र कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

जर हा IPO स्टॉक 98 रुपये या अप्पर प्राइस बँडवर वाटप करण्यात आला, तर एम्फोर्स ऑटोटेक कंपनीचे शेअर्स 158 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. तज्ञांच्या मते, एम्फोर्स ऑटोटेक IPO स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 60 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून देऊ शकतो.

या कंपनीचे IPO शेअर्स मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये केवळ 1 लॉट खरेदी करू शकतात. एका लॉटमध्ये या कंपनीने 1200 शेअर्स ठेवले आहे. रिटेल गुंतवणूकदारांना IPO मध्ये एक लॉट खरेदी करण्यासाठी 117600 रुपये जमा करावे लागतील.

एम्फोर्स ऑटोटेक कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील. या कंपनीच्या IPO चा आकार 53.90 कोटी रुपये आहे. आयपीओपूर्वी या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 100 टक्के भाग भांडवल धारण केले होते. IPO नंतर हे प्रमाण 73.17 टक्केवर येईल.

एम्फोर्स ऑटोटेक कंपनी IPO च्या माध्यमातून जमा केलेला निधी कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंवर खर्च करणार आहे. काही रक्कम कंपनी एम्फोर्स मोबिलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या उपकंपनीमध्ये गुंतवणूक करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP Emmforce Autotech LTD 22 April 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x