5 August 2020 4:36 PM
अँप डाउनलोड

अमित शाह, भय्याजी जोशी आणि सरसंघचालक बैठक

नागपूर : बुधवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत आणि भय्याजी जोशी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडल्याचे वृत्त आहे. तसेच विश्व हिंदू परिषदेवर नेमणूक झालेले विष्णू सदाशिव कोकजे हे देखील उपस्थित होते, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सध्या देशभरात २०१९ मधील निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकी संदर्भात महत्वाची चर्चा पार पडल्याचे वृत्त आहे. संघ परिवार प्रत्येक निवडणुकीत भाजपसाठी नियोजन पद्धतीने काम करत असतो हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तयारी यावर चर्चा झाल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. सध्या कर्नाटकची निवडणूक भाजपासाठी पोषक नसल्याने संघ परिवार कार्यरत होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या बैठकीबाबत संघाकडून कोणताही दुजोरा मिळू शकलेला नाही.

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येणार असल्याचे सर्वच जनमत चाचणी आणि सर्वेक्षणात पुढे आलं आहे. त्यामुळे ही कर्नाटक निवडणूक भाजपासाठी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीचा विचार करता खूपच महत्वाची आहे. त्यामुळे अमित शाह यांचा नागपूर दौरा खूप महत्वाचा ठरतो.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(239)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x