13 May 2021 2:17 AM
अँप डाउनलोड

जम्मू-काश्मीर: पुलवामा चकमकीत २ जवान शहीद, तर १ दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटे झालेल्या चकमकीत १ दहशदवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या चकमकीदरम्यान लष्कराचे २ जवान देखील शहीद झाले आहेत. परिसरात अजून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने जोरदार शोधमोहीम सुरू आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. पुलवामामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले होते. त्यानंतर परिसरात जोरदार शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x