3 August 2020 2:28 PM
अँप डाउनलोड

#MeToo : नाना पाटेकर व साजिद खानवर आरोप झाल्याने ‘हाऊसफुल ४’चे दरवाजे बंद?

मुंबई : अभिनेते नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर गैरवर्तणुकीचे जाहीर आरोप झाल्याने त्यांच्यासोबत यापुढे चित्रपटात काम करणार नाही असा निर्णय बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमार याने घेतला आहे. त्यामुळे आता #MeToo मोहिमेमुळे झालेल्या आरोप प्रत्यारोपाणानंतर फिल्मी दुनियेतील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

तसेच साजिद खान दिग्दर्शित सिनेमातून साजिद खानाने सिनेमातून काढता पाय घेतला असला तरी आणि अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हाऊसफुल ४’ या सिनेमातून नाना पाटेकर यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नाना पाटेकर यांना या चित्रपटातून पायउतार होण्याची वेळ येऊ शकते. तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान गैरवर्तणूक केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. दरम्यान, या आरोपानंतर गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलेच पेटले आहे. तसेच त्या आरोपानंतर संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे.

नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आपण या दोघांसोबत काम करणार नाही अशी भूमिका अभिनेता अक्षय कुमारने घेतली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढील कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि त्यातच आता नानांना या चित्रपटातून काढणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर साजिद खान यानेही चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या पदावरून काढता पाय घेतला आहे. एका ट्विटद्वारे त्याने ही माहिती दिली.. ‘माझ्यावर जे काही आरोप होत आहेत ते खोटे असल्याचं मी सिद्ध करेनच. सत्य लोकांना लवकरच कळेल. पण तोपर्यंत माझ्याविषयी कोणतंही मत तयार करून गैरसमज करून घेऊ नका’ असं साजिदनं आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Akshay Kumar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x