27 September 2022 2:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | या स्वस्त शेअरच्या संयमी गुंतवणूकदारांची लॉटरीच लागली, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3.85 कोटी परतावा, नाव सेव्ह करा Viral Video | गायीने ATM मशीन सेंटरचा बनवला गोठा, पैसे काढताना ग्राहकांवर तोंडाला रुमाल लावायची वेळ, पहा व्हिडिओ Multibagger Stocks | हा स्टॉक मंदीतही पैसा वेगाने वाढवतो, तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला Infinix Zero Utra 5G Smartphone | 200MP कॅमेरासह इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G स्मार्टफोन लाँच होणार, फीचर्स आणि किंमत पहा WAPCOS IPO | वापकोस कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या Private Employee Salary Hike | खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते?, रिपोर्ट प्रसिद्ध झाला Zomato Share Price | झोमॅटो शेअरच्या गुंतवणूकदारांची धाकधूक थांबेना, थेट 60 रुपयांवर आला, पुढे काय होणार जाणून घ्या
x

आजचे राशिभविष्य | बुधवार | १६ सप्टेंबर २०२०

Daily Horoscope, Astrology, Kundali Match Making, Marathi News ABP Maza

मेष: आज मनाप्रमाणे कामे कराल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. आज चांगले शुभ योग जुळून येतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. डोक्यावर बर्फ ठेवावा.

वृषभ: येणे वसूल होईल. दिवस चांगला जाईल. भौतिक वस्तूंची खरेदी कराल. ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. त्यांचा सल्ला मोलाचा ठरेल.

मिथुन: मनोरंजनात्मक दिवस. उत्तम गृहसौख्य लाभेल. मित्रांशी नाते अतूट होईल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. कर्जाऊ रक्कम कमी होईल.

कर्क: कामात अधिकार प्राप्त होतील. कौटुंबिक खर्च वाढेल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागा. प्रयत्नांची कास सोडू नये. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल.

सिंह: मित्रांबरोबर काळ चांगला जाईल. काही संमिश्र घटना घडू शकतात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे. वाणीत माधुर्य ठेवावे. टीमवर्कचा चांगला फडा होईल.

कन्या: घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. धनसंचय वृद्धिंगत होईल. वाहन जपून चालवा. सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावेत. महिला सहकारी उत्तम मदत करतील.

तूळ: व्यावसायिक कामातून आनंद मिळेल. एखादी मोठी वस्तु खरेदी कराल. तांत्रिक बाजू लक्षात घ्यावी. कामाची योग्य चीज होताना दिसेल. मोठ्या व्यक्तीची भेट होऊ शकेल.

वृश्चिक: आर्थिक गैरसमज टाळावेत. आनंदाची अनुभूति देणारा दिवस. प्रलंबित कामे एक एक करून मार्गी लागतील. औद्योगिक क्षेत्रात एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.

धनू: घरासाठी मोठी वस्तु खरेदी कराल. मुलांशी सुसंवाद साधावा. कर्जाऊ रक्कम फेडू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. अनावश्यक खर्च टाळावा.

मकर: जोडीदारामुळे भाग्योदय होईल. घरात डोकं शांत ठेवा. कामानिमित्त प्रवास संभवतात. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. जुन्या मित्रांची अचानक भेट होईल.

कुंभ: स्वप्नात जास्त रमू नका. आपले कर्तृत्व दिसून येईल. सामाजिक गोष्टीत मन रमेल. उत्साहाच्या जोरावर कामे हाती घ्याल. स्पर्धेत भाग घ्याल.

मीन: प्रेमात होकाराची शक्यता. कौटुंबिक वाद टाळावेत. नातेवाईकांची मदत मिळेल. कामाचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.

 

News English Title: Daily Horoscope Astrology In Marathi Saturday 16 September 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(318)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x