12 December 2024 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024
x

आज मोदींचा वाराणसीत रोड शो

BJP, Narendra Modi

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर आणि वाराणसी या दोन मतदारसंघांतून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. उद्या वाराणसीतून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यापूर्वी आज ६ किलोमीटरचा भव्य रोड शो करणार आहेत. रोड शो नंतर मोदी दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीत सामील होतील. त्यानंतर काशी विश्वनाथाचे दर्शन घेतील. तसेच ते पेरीस हॉटेलमध्ये वाराणसीच्या ३००० लोकांशी संवादही साधणार आहेत.

‘मैं यहां आया नहीं हूं, मुझे मां गंगे ने बुलाया है’ असे मोदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी वाराणसीत म्हणाले होते. आज पुन्हा एकदा ते वाराणसीत दाखल होणार आहेत. यावेळी भव्य रोड शो करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. ते दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बाबतपूर विमानतळावर दाखल होतील. तिथून बनारस हिंदू विश्वविद्यालयात जाऊन पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेस वंदन करून त्यांच्या रोड शोला सुरुवात होईल.

पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये भाजपाचे दिग्गज नेते सामील होण्याची शक्यता आहे. लंकेहून दशाश्वमेध घाटापर्यंत होणाऱ्या या रोड शोमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, सुषमा स्वराज, पियूष गोयल, योगी आदित्यनाथ, इत्यादी उपस्थित असणार आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x