14 January 2025 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATAPOWER IREDA Share Price | इरेडा शेअर उच्चांकी पातळीवरून 35% घसरला, आता ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
x

एकनाथ शिंदे फक्त नामधारी मुख्यमंत्री? | भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेत फडणवीसांची हजेरी, विरोधकांची टीका

BJP Mukhyamantri Parishad

Devendra Fadnavis | दिल्लीत भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री परिषद शनिवारी पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र सध्या चर्चा होतेय ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. मुख्यमंत्र्यांची परिषद असताना देवेंद्र फडणवीस तिथे कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपची ही मुख्यमंत्री परिषद जवळपास ५ तास चालली. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीला भाजप आणि एनडीएची सत्ता असलेल्या १२ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

अहवाल सादर करण्याच्या सूचना :
आप-आपल्या राज्यात राबवलेल्या कल्यणाकारी योजनांविषयी या परिषदेत अहवाल सादर करण्याच्या सूचना या परिषदेत देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. केंद्राच्या योजना राज्यात चांगल्या पद्धतीने राबवण्यास मोदींनी सांगितलं आहे. विशेषत: जिथे भाजपची सत्ता आहे त्या राज्यात या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्यास सांगितले आहे. खेळाडुंना सर्वोत्तम सोयी सुविधा राज्यात मिळाव्यात याकडेही मोदींनी लक्ष वेधले.

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी संवाद साधला :
या बैठकीत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. याआधीची मख्यमंत्री परिषदेची बैठक डिसेंबर २०२१ मध्ये वाराणसीत झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Mukhyamantri Parishad DCM Devendra Fadnavis check details 25 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x