23 April 2024 7:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

#JantaCurfew: २२ तारखेला देशात 'जनता कर्फ्यु' पाळा - पंतप्रधान

PM Narendra Modi, Janata Carfew 22 March, Corona Crisis

नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरातून फैलावलेल्या करोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातलाय. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे जगभरात ९००० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. भारतातही चार जणांना करोना व्हायरच्या संसर्गानं प्राण गमवावा लागलाय. पंजाब, दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत प्रत्येकी एक बळी गेलाय. तर देशाभरात १७३ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वात जास्त अर्थात ४४ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करत होते.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील जेवढ्या देशांना प्रभावित केले नाही त्यापेक्षाही अधिक प्रभाव कोरोना विषाणूने केले आहे. ही चिंताजनक बाब आहे. तुम्ही मला आतापर्यंत खूप काही दिले त्यामुळे या संकटाशी लढण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे असे मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे.

मोदी सुरुवातीला म्हणाले की, मी भारतीयांकडे काहीतरी मागायला आलो आहे. अद्याप करोनावर कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. तसंच काही उपायही शोधण्यात आलेला नाही. त्यामुळे देशवासियांची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. जगातल्या ज्या देशांमध्ये करोना व्हायरस आणि त्याचा प्रभाव जास्त आहे तिथे अचानक करोनाचं संकट गहिरं झालं आहे. करोनाग्रस्तांची संख्या त्या देशांमध्ये वेगाने वाढली आहे. भारत सरकार या स्थितीबाबत नजर ठेवून आहे. भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या घरात आहे. आपण विकासासाठी प्रयत्नशील देश आहोत. आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांचं पालन करु, असं ते म्हणाले.

 

News English Summery:  PM Modi said, “I am demanding people’s curfew today. Janata curfew means that every citizen should comply with the restrictions he imposes on himself for his own safety. Modi has also made it clear that essential services have been excluded. Modi has also said that all the state governments in the country should follow this order. Modi initially said, “I have come to the Indians to ask for something.” No vaccine has been detected on Corona yet. And no solution has been discovered. Therefore, it is natural for the countrymen to raise their concerns. In countries around the world where the Corona virus and its effects are high, the crisis of Corona has suddenly intensified. The number of coronary arteries has increased rapidly in those countries. The Government of India is monitoring this situation. India has a population of about 130 crores. We are a country striving for development. Prime Minister Narendra Modi has said that this crisis on our country is not even a tool. He said that everyone should be restrained and be determined to abide by the instructions of the Central and State Government.

 

News English Title:  Story Janata Curfew on 22 March declared PM Narendra Modi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x