13 December 2024 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
x

आम आदमी पार्टी उभी करत आहे १५,००० जणांची सोशल मीडिया आर्मी

नवी दिल्ली : आगामी निवडणूक या सर्वच पक्षांची अग्निपरीक्षा ठरणार आहे. त्यात समाज माध्यमांचा उपयोग करून विरोधकांच्या रणनीतील शह देण्यासाठी आणि आप पक्षा विरूद्धच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. कारण आता आम आदमी पक्ष तब्बल १५,००० सोशल मीडिया आर्मी उभी करत असून भाजपला केंद्रस्थानी ठेऊन सर्व योजना आखली जात असल्याचं वृत्त आहे. प्रिंट मीडियापेक्षा डिजिटल न्युज सर्वात प्रभावी माध्यम ठरलं आहे आणि बातमी वेगाने व्हायरल करण्यासाठी समाज माध्यमं हा त्यामागील सर्वात मोठा स्रोत असल्याचं सर्वच प्रमुख पक्षांच्या ध्यानात आलं आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत फेसबुक, व्हाट्सअँप आणि युट्युब’चा प्रचंड मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे हे वास्तव आहे. त्यासाठी आम आदमी पार्टी आत्तापासूनच सज्ज झाली आहे. भाजप आयटी सेलच्या माध्यमातून २०१४ मध्ये विरोधकांविरुद्ध अतिशय खालच्या थरातील प्रचार सुरु होता. त्यामुळे विरोधकांची प्रतिमा शिस्तबद्ध मलिन करण्यात आली होती. दरम्यान, दिल्लीच्या विधानसभेवर आपची सत्ता असली तरी दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा भाजपच्या कब्ज्यात आहेत आणि त्यावर आम आदमी पक्षाची नजर आहे.

भाजपने केलेल्या अपप्रचावर तुटून पडणे आणि त्यांना योग्य उत्तर देणे, तसेच पक्षाची कामं सामान्यांपर्यंत पोहोचवून त्याचा निरीक्षकांमार्फत आढावा घेणे असे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक जशी विरोधकांसाठी महत्वाची आहे, तशी भाजपसाठी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत समाज माध्यमांचा अतिरेकी वापर होईल आणि डिजिटल न्यूजचा वेगाने प्रसार करून विरोधकांना जेरीस आणण्याचा प्रयत्न सर्वच पक्ष करतील अशी शक्यता आहे.

असं असलं तरी समाज माध्यमांवर ‘डेटा माइनिंग’ करून ती अपेक्षित मतदाराकडे योग्य प्रकारे पोहोचविण्याचे कौशल्य आजच्या घडीला समाज माध्यमं वापरणाऱ्यांना आणि तज्ज्ञ म्हणून मिरवणाऱ्यांना सुद्धा अवगत नसल्याचे अनेक संशोधनात पुढे आले आहे. त्यामुळे समाज माध्यमांचा वापर करून माहिती जेथे पोहोचविणे अपेक्षित आहे, तिथे ती कधीच पोहोचत नाही. पण जो आपला मतदारच नाही, तिथेच ती अधिक पसरविण्यात येते असं अभ्यासातून पुढे येत आहे.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x