24 January 2022 9:21 AM
अँप डाउनलोड

भाजप 'IT सेल' प्रमुख म्हणजे भाजपचा स्टीव्ह स्मिथच : कीर्ती आझाद

नवी दिल्ली : भाजप ‘IT सेल’ प्रमुख अमित मालवीय म्हणजे भाजपचा स्टीव्ह स्मिथच आहे असा सणसणीत टोला भाजपचेच खासदार कीर्ती आझाद यांनी लगावला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या तारखा घोषित करण्याआधीच भाजप ‘IT सेल’ प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवरून त्या घोषित केल्या होत्या. त्याला अनुसरूनच भाजपचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी अमित मालवीय यांची तुलना आॅस्ट्रेलियाचा वादग्रस्त क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथशी केली आहे.

आॅस्ट्रेलियाचा वादग्रस्त क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ हा बॉल टॅम्परिंगप्रकारानी दोषी आढळल्यानंतर त्याला आॅस्ट्रेलियाच्या कर्णधार पदावरून दूर करण्यात आले. तसेच अमित मालवीय यांना भारतीय निवडणूक आयोगाच्या आधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा टॅम्परिंग केल्या आहेत, त्यामुळे अमित मालवीय यांची भाजप ‘IT सेलच्या’ प्रमुखपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात यावी असं कीर्ती आझाद एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हणाले.

भाजप ‘IT सेल’ प्रमुख अमित मालवीय यांनी मोठ्या ‘आयटी त’ केलेल्या अति-उतावळेपणामुळे भारतीय निवडणूक आयोगानेसुद्धा चिंता व्यक्त करून विषय खूपच गंभीर असल्याचे म्हटले होते. समाज माध्यमांवर सुद्धा मालवीय यांची खिल्ली उडविण्यात येत आहे. आता भाजपच्या अमित मालवीय यांनी त्यांच्या मोठ्या ‘आयटी त’ लोकसभेच्या तारखासुध्दा जाहीर कराव्यात अशी फिरकी नेटिझन्स घेताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Amit Malviya(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x